शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
5
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
6
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
7
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
8
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
9
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
10
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
11
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
12
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
13
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
14
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
15
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
16
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
17
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
18
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
19
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
20
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस

जिल्हा कचेरीसमोर परीट समाजाचे कपडे धुणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 23:11 IST

धोबी (परीट) समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याकरिता डॉ. डी.एम. भांडे समितीचा अहवाल राज्याच्या शिफारशींसह केंद्र शासनाला पाठविण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी महाराष्ट्र धोबी (परीट) समाज आरक्षण समन्वय समितीने जिल्हा कचेरीसमोर लोकप्रतिनिधींचे कपडे धुण्याचे प्रतीकात्मक आंदोलन करून मागणीकडे शासनाचे लक्ष वेधले.

ठळक मुद्देलक्षवेध : धोबी (परीट) समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : धोबी (परीट) समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याकरिता डॉ. डी.एम. भांडे समितीचा अहवाल राज्याच्या शिफारशींसह केंद्र शासनाला पाठविण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी महाराष्ट्र धोबी (परीट) समाज आरक्षण समन्वय समितीने जिल्हा कचेरीसमोर लोकप्रतिनिधींचे कपडे धुण्याचे प्रतीकात्मक आंदोलन करून मागणीकडे शासनाचे लक्ष वेधले. यावेळी जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्यामार्फत मागणीचे निवेदन शासनाकडे पाठविण्यात आले.देशभरातील धोबी समाज आजही पारंपरिक व्यवसायातून उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र, हा समाज आपल्या हक्कांपासून अद्यापही वंचित आहेत. देशाच्या १८ राज्यांमध्ये धोबी समाज अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट आहे. मात्र, महाराष्ट्र राज्यात धोबी समाज ओबीसीमध्ये समाविष्ट आहेत. परिणामी एकाच समाजाचे देशात दोन प्रवर्गात विभाजन झाले आहे. त्यामुळे एकाच समाजाला दोन निकष कसे, असा प्रश्न धोबी समाजबांधवांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, १९६० पूर्वी भंडारा, गोंदिया आणि बुलडाणा जिल्ह्यात हा समाज अनुसूचित जमातीमध्येच होता. मात्र, १ मे १०६० रोजी महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर हे आरक्षण रद्द करण्यात आले. धोबी समाज मागील ६१ वर्षांपासून या सवलतीसाठी संघर्ष करीत आहे. त्यासाठी निवेदने, धरणे, आंदोलन करण्यात आले. २३ मार्च २००१ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य शासनाने डॉ. डी.एम. भांडे यांच्या अध्यक्षतेखाली धोबी समाज पुनर्विलोकन समितीची घोषणा केली. ५ सप्टेंबर २००१ रोजी समिती गठित करण्यात आली. समितीने आपला अहवाल २८ फेब्रुवारी २००२ रोजी शासनाकडे सादर केला. त्यामध्ये धोबी समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्याची शिफारस केली. याला १६ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे; मात्र शासनाने यावर अद्यापही निर्णय घेतला नाही. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी महाराष्ट्र धोबी (प्न१ट) समाज आरक्षण समन्वय समितीने लोकप्रतिनिधींचे कपडे धुण्याचे प्रतीकात्मक आंदोलन केले.डॉ. डी.एम. भांडे समितीचा अहवाल राज्यांच्या शिफारशींसह केंद्र शासनाकडे पाठवाव्यात. डॉ बाबासाहेब आंबेडकर समितीचा अहवाल रद्द करावा. संत गाडगेबाबांना ‘भारतरत्न’ उपाधी द्यावी. श्री क्षेत्र ऋणमोचण येथे स्मारक उभारण्यासाठी निधी द्यावा. संत गाडगेबाबा यांचा २३ फेब्रुवारी हा जन्मदिन स्वच्छता दिन जाहीर करावा. अमरावती एक्स्प्रेसला संत गाडगेबाबा यांचे नाव देण्यात यावे आदी मागण्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे केल्या आहेत. आंदोलनात राजेंद्र उंबरकर, वैजनाथ बुंदीले, संजय बुंदीले, मोहन बुंदीले, मोहन गाजले, चंद्रशेखर कडुकार, वैशाली केळझरकर, मंगला पारधी, ज्योती धुराडकर, सुनीता चिकटे, निजय बुंदीले, आशा गाजले, सुषमा अमृतकर, रमेश तायवाडे, सुलभा रेवतकर, संजय चौधरी, राजेश गवळी यांच्यासह जिल्हा व राज्य पदाधिकारी तसेच परीट समाजबांधव सहभागी झाले होते.