शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकांकडून ‘सखीं’नी घेतले रक्षेचे वचन!

By admin | Updated: August 10, 2014 22:45 IST

बहीण-भावाच्या प्रेमाचा आगळा सण म्हणजे ‘रक्षाबंधन’. भावा-बहिणीच्या अतुट नात्याचे प्रतीक असलेला हा सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. यंदा लोकमत सखी मंच व बालविकास मंचद्वारे

अमरावती : बहीण-भावाच्या प्रेमाचा आगळा सण म्हणजे ‘रक्षाबंधन’. भावा-बहिणीच्या अतुट नात्याचे प्रतीक असलेला हा सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. यंदा लोकमत सखी मंच व बालविकास मंचद्वारे आयोजित उपक्रमाच्या माध्यमातून सखींनी राज्य राखीव पोलीस बलातील जवानांना राख्या बांधून रक्षेचे वचन मागितले. त्यामुळे हा सण आगळा-वेगळा ठरला.देशाच्या रक्षणार्थ सीमेवर तैनात जवान डोळ्यांत तेल घालून सदैव तत्पर असतात. त्यामुळेच त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘लोकमत सखी-बालविकास मंच’द्वारे हा रक्षाबंंधनाचा उपक्रम साजरा करण्यात आला. भावनिक बंध घट्ट करण्यासाठी लोकमत सखी मंचच्या सदस्य सखींनी त्यांना राख्या बांधल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसआरपीएफचे असिस्टंट कमांडंट गोपालसिंह कोचर, भारतीय जैन समाज संघटनेचे अध्यक्ष महेंद्र भंसाली, जैन युवामंचचे हरीश गांधी, व ‘लोकमत’चे जयंत कौलगीकर उपस्थित होते. यावेळी लोकमत सखीमंचच्या विभाग प्रमुख ज्योती वैद्य, संजना आंचलिया यांनी असिस्टंट कमान्डंट गोपालसिंह कोचर यांना राखी बांधली. त्यानंर उपस्थित सखींनी पीएसआय कमलसिंग, मारूती नेवारे, आर.डी. चव्हाण, आर.आर. चौधरी, पीआय बी.एस. चोपडे, डी.एस. वानखडे, कमांडंट एन.एन.सोळंके यांना राख्या बांधल्या. त्यानंतर दौन मिनिटे मौन पाळून शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.श्रध्दा डोंगरदिवे यांनी रक्षाबंधनावर आधारित गीत सादर केले. नीलिमा देशमुख यांनी देशभक्तीपर गीत प्रस्तुत केले. या कार्यक्रमात धामणगाव रेल्वे येथील हिराबाई गोयनका कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वनिर्मित ७०० राख्या वीर जवानांसाठी पाठविण्यात आल्या. या उपक्रमात शाळेचे शिक्षक श्रीकांत गुहे, रवींद्र गिरी यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी भारतीय जैन संगटना, जैन संस्कार युवामंच, ‘लोकमत’च्या सर्व विभाग प्रतिनिधींचे सहकार्य लाभले. ‘लोकमत’च्या माध्यमातून गोळा करण्यात आलेल्या हजारो राख्या सैनिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी खुद्द कमांडंट साहेबांनी स्वीकारली आहे. (प्रतिनिधी)