शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

इंदूरची वारी; पडली भारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:12 IST

पान २ ची लिड धारणी : संयुक्त कुटुंब म्हणून एकाच घरात सोबत राहणाऱ्या काकांच्या घरातून तब्बल १३ लाख ...

पान २ ची लिड

धारणी : संयुक्त कुटुंब म्हणून एकाच घरात सोबत राहणाऱ्या काकांच्या घरातून तब्बल १३ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या आरोपी पुतण्याची न्यायालयाने कारागृहात रवानगी केली. मोहम्मद वसीम सौदागर असे आरोपीचे नाव आहे. त्याचेकडून चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने, मनगटी घड्याळ व १ लाख रुपये वगळता संपूर्ण रोख जप्त करण्यात आली. चोरी केल्यानंतर आरोपीने इंदूरला जाऊन साहित्य खरेदी केले. त्यामुळेच तो पोलिसांच्या रडारवर आला. अन् पोलिसी खाक्या दाखवताच पोपटासारखा बोलू लागला. क्षणार्धात त्याने काकाकडे केलेल्या चोरीची कबुली दिली.

धारणी पोलिसांनी माजी नगरसेवक असिफ सौदागर यांच्या घरात झालेल्या या जबर चोरीचा छडा लावून घरातील सदस्य असलेल्या भावाच्या मुलाला मुद्देमालासह ३ फेब्रुवारी रोजी रात्री अटक केली होती. त्याला ४ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याच्याकडून कोणतीही रक्कम किंवा दागिने जप्त करणे शिल्लक नसल्यामुळे पोलीस कोठडीची आवश्यकता नव्हती. न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडी मंजूर करून तुरुंगात रवानगी केली. आरोपीकडून दाखल केलेल्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे.

असा झाला पर्दाफाश

दरम्यान, एवढ्या मोठ्या चोरीचा कुठलाच सुगावा लागत नसल्याने पोलिसांनी तपासाची दिशा फिर्यादी आसिफ सौदागर यांच्या कौटुंबिक सदस्यांकडे वळविला. चौकशीदरम्यान, आरोपी मोहम्मद वसीम सौदागर हा घटनेनंतर इंदूरला गेला. तेथून त्याने सुमारे १ लाख रुपयांचे हार्डवेअरशी संबंधित साहित्य विकत आणल्याचे उघड झाले. तो धागा पकडून पोलिसांनी त्याची उलटतपासणी घेतली. त्यात तो अलगद अडकला. आता चोरीची कबुली दिल्याशिवाय पर्यायच नाही, हे उमगल्याने त्याने चोरलेला मुद्देमाल कुठे दडवून ठेवला, ते सांगितले. स्वत:च्या बेडरूममधील दिवाणाच्या आत त्याने सोन्याचांदीचे दागिने व रोख एका थैलीत बांधून ठेवली होती.

१७ जानेवारी रोजी घडली होती चोरी

१७ जानेवारी रोजी सकाळी संपुर्ण सौदागर कुटूंब अचलपूर येथे एका कार्यक्रमानिमित्त गेले होते. ते १८ जानेवारी रोजी सकाळी ९ च्या सुमारास धारणी येथे घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघड झाला. तक्रारीनुसार, ९ लाख ३० हजार ४२० रुपये किमतींचे सोन्याचे दागिने, ७३ हजार २०० रुपयांचे चांदीचे दागिने, तर २ लाख २५ हजार रुपये रोख, मनगटी घड्याळ असा एकूण १२ लाख ३३ हजार ६२० रुपयांचा ऐवज चोरीला गेला. याप्रकरणी १९ जानेवारी रोजी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कोट

१३ लाख रुपयांच्या चोरीप्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. चौकशीदरम्यान, आरोपी हा इंदूरला जाऊन खरेदी करून आल्याचा धागा पकडत मोहीम फत्ते करण्यात आली.

- विलास कुळकर्णी, ठाणेदार, धारणी.

------------