शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

वऱ्हाडाच्या ट्रकला अपघात, ४० जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:16 IST

लग्न आटोपून वऱ्हाडी घेऊन परतणाऱ्या ट्रकला घटांगनजीक अपघात झाल्याने ४० जण जखमी झाले. त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.

ठळक मुद्देघटांगनजीकची घटना : चालक दारुच्या नशेत, पाच गंभीर, गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : लग्न आटोपून वऱ्हाडी घेऊन परतणाऱ्या ट्रकला घटांगनजीक अपघात झाल्याने ४० जण जखमी झाले. त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. रविवारी रात्री ९ च्या सुमारास घटांगनजीक ही घटना घडली. चिखलदरा पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. जखमींवर सलोना प्राथमिक आरोग्य केंद्र, अचलपूर उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.धारणी तालुक्यातील पाथरपूर येथून रविवारी सकाळी ७ वाजता एमएच ०४ एचडी ०४५३ क्रमांकाचा ट्रक ५५ वऱ्हाडींना घेऊन मध्य प्रदेशातील थापोडा येथे गेला. परतीच्या प्रवासात घटांगनजीक भरधाव ट्रक रस्त्याखाली उतरून ३०० फूट अंतरापर्यंत फरफटत गेला आणि उलटला. या अपघातात ४० वºहाडी जखमी झाले. पाच जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चिखलदरा पोलिसांनी जयराम भोले भिलावेकर (८०, रा. पाथरपूर) यांच्या फिर्यादीवरून पसार चालकाविरुद्ध भादंविच्या कलम २७९, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा दाखल केला.नेटवर्क नसल्याने अफवांना ऊतघटांग, सलोना, सेमाडोह या परिसरात कुठलेही मोबाइल नेटवर्क मिळत नाही. रविवारी रात्री झालेल्या अपघाताची माहिती प्रशासनाला देण्यासाठी घटांग येथील काही युवकांनी उंच टेकडीवर जाऊन संवाद साधला. तरीही अपघातात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची अफवा पसरली होती. मध्यरात्री सर्व शंका-कुशंकांना विराम मिळाला.रुग्णसेवा अलर्टरविवारी रात्री ८.३० वाजता ट्रक अपघात होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले लगेच नजीकच्या सलोना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ रुग्णवाहिकेने दाखल करण्यात आले. त्यानंतर अचलपूर व अमरावती येथे गंभीर रुग्णांना उपचारार्थ दाखल करण्यात आले अपघात घडताच चिखलदरा पोलीस तथा परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात अपघाताची माहिती मिळताच सर्व यंत्रणा अलर्ट करण्यात आली होती. अधीक्षक डॉक्टर जाकीर स्वत: जखमींची माहिती घेत होते.