शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

धारणी नगरपंचायत निवडणुकीचे प्रभागनिहाय आरक्षण दुसऱ्यादा जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:13 IST

धारणी नगरपंचायतचा कार्यकाळ २९ नोव्हेंबर रोजी संपत असल्याने १० नोव्हेंबरला पहिल्यांदा प्रभागनिहाय आरक्षण प्रक्रिया पार पडली होती. ती ...

धारणी नगरपंचायतचा कार्यकाळ २९ नोव्हेंबर रोजी संपत असल्याने १० नोव्हेंबरला पहिल्यांदा प्रभागनिहाय आरक्षण प्रक्रिया पार पडली होती. ती प्रक्रिया चुकीची झाल्याने धारणीवासीयांनी त्यावर आक्षेप नोंदविला होता. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. त्यांनी सदर चुकीची आरक्षण प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविली. त्यांनी २८ डिसेंबरला दुसऱ्यांदा नवीन प्रक्रिया घेण्याचे आदेशित केल्याने बुधवारी नगरपंचायत प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले.

२०१५ मध्ये राखीव आरक्षित प्रभागाचे आरक्षण वगळून चक्राणू पद्धतीने आरक्षण जाहीर करण्यात आले, तर नागरिकांचे मागास प्रवर्ग, सर्वसाधारण प्रवर्ग व अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला यासाठी ईश्वरचिठ्ठी पद्धतीने महिलांचे आरक्षण काढण्यात आले. चिमुकली हिमानी पटेल हिच्या हस्ते ईश्वरचिठ्ठी काढून आरक्षण जाहीर करण्यात आले. धारणी नगरपंचायतीच्या १७ प्रभागांमधून प्रभाग १ करिता अनुसूचित जाती महिला, प्रभाग २ करिता अनुसूचित जाती सर्वसाधारण महिला, प्रभाग ३ करिता नागरिकांचा मागास वर्ग महिला, प्रभाग ४ करिता अनुसूचित जमाती महिला, प्रभाग ५ करिता अनुसूचित जमाती सर्वसाधारण, प्रभाग ६ करिता नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग ७ करिता सर्वसाधारण, प्रभाग ८ करिता अनुसूचित जमाती सर्वसाधारण, प्रभाग ९ करिता सर्वसाधारण, प्रभाग १० करिता नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग ११ करिता सर्वसाधारण महिला, प्रभाग १२ करिता अनुसूचित जमाती महिला, प्रभाग १३ करिता नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग १४ करिता सर्वसाधारण महिला, प्रभाग १५ करिता सर्वसाधारण महिला, प्रभाग १६ करिता सर्वसाधारण, प्रभाग १७ करिता नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे आरक्षण जाहीर झाले. निवडणूक लढणाऱ्यांनी प्रभागनिहाय लॉबिंग सुरू केले आहे.