शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग रचना : दुधाने पोळले, ताकही फुंकून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 05:00 IST

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यात आली होती. राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार सरकारने आपल्याकडे घेतले. त्यामुळे तीन सदस्यीय प्रभागानुसारच निवडणूक होण्याची शक्यता जास्त आहे. तरीही काही नगरसेवक दोन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणूक होईल, अशी आशा लावून बसले आहेत. परंतु, यात काही तथ्य नाही, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रभाग रचनेच्या आदेशाने राजकारण हळूहळू तापू लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीस अनुसरून प्रभाग रचना करावी, असे आदेश नगर विकास विभागाने महानगरपालिका आयुक्तांना दिले आहेत. ११ एप्रिल रोजी ते आदेश आले होते. मात्र, पुढे १४ ते १७ एप्रिल या कालावधीत सुट्या आल्याने १८ एप्रिलपासून प्रभागरचना प्रक्रियेला वेग येणार आहे. याआधीची प्रभाग रचना ‘लीक’ झाल्याने महापालिका आयुक्तांची थेट बदलीच झाली. दोघांचे निलंबनही झाले. त्यामुळे दुधाने ओठ पोळलेले प्रशासन आता ताकही फुंकून पिण्याच्या मानसिकतेत आहे. दरम्यान, राज्यातील निवडणूक होऊ घातलेल्या महापालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेची प्रक्रिया अंतिम झाली आहे. ओबीसी आरक्षण नसल्याने राज्य सरकारने विधिमंडळात नवीन विधेयकाद्वारे कायदा पारित केला. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यावर २१ एप्रिलला सुनावणी होणार आहे. १८ ते २१ दरम्यान राज्य निवडणूक आयोग व नगरविकास विभागाच्या नव्या आदेशाकडेदेखील प्रशासनाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन २१ पर्यंत ‘आस्ते कदम’च्या भूमिकेत आहे. मात्र, राज्य निवडणूक आयोगाच्या गाईड लाईननुसार प्रभाग रचनेचे प्रारूप तयार होणार असल्याने इच्छुकांसाठी बाब आनंददायी आहे. 

...असे आहेत आदेश महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार, १९४९मधील अधिनियमानुसार, ज्या महापालिकांची मुदत संपली व संपणार आहे, त्यांना आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी जनगणनेनुसार प्रभाग रचना करावी लागेल. यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या २८ डिसेंबर २०२१ व २७ जानेवारी २०२२  रोजीच्या मार्गदर्शक सूचनांचा आधार घ्यावा.  त्यानुसार, तीन सदस्यीय प्रभाग रचना तयार करण्यात येणार आहे. 

निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसारचनिवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यात आली होती. राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार सरकारने आपल्याकडे घेतले. त्यामुळे तीन सदस्यीय प्रभागानुसारच निवडणूक होण्याची शक्यता जास्त आहे. तरीही काही नगरसेवक दोन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणूक होईल, अशी आशा लावून बसले आहेत. परंतु, यात काही तथ्य नाही, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रभाग रचनेच्या आदेशाने राजकारण हळूहळू तापू लागले आहे.

राज्य सरकारकडून अधिकाराची अंमलबजावणी राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधिमंडळात विशेष कायदा पारित केला. राज्यातील १८ महापालिकांसाठी तयार केलेली प्रारूप प्रभाग रचना रद्द केली. राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार राज्य सरकारने आपल्याकडे  घेतले. निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेला स्थगिती दिली. त्यानंतर राज्य सरकारने  कोणतीही कारवाई केली नव्हती. आता या अधिकाराची अंमलबजावणी सुरू केली.

 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग