अमरावती : जिल्ह्यात मागील वर्षामध्ये वादळी पाऊस व गारपिठीच्या तडाख्यात अनेक शेतकऱ्यांना शेती पिकांपासून वंचित राहावे लागले. त्या नुकसानाची भरपाई शासनाकडून देण्यात येत आहे.मात्र नांदगाव खडेश्वर तालुक्यातील जावरा गावात गारपिठग्रस्त शेतकऱ्यांना अजुनही नुकसान भरपाई मिळाली नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. मागील वर्षी आलेल्या वादळी पावसासह गारपिटीने शेतकऱ्यांना हैराण करुन सोडले होते.त्यामध्ये शेतीचे अतोनात नुकसान झाल्याने अनेक शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले होते. काही शेतकऱ्यांनी तर आत्महत्या सुध्दा केल्या आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्यावतीने गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र या मदतीपासुन जावरा (जनुना) येथील काही शेतकरी वंचित राहत आहे.शासनाने तालुकास्तरावर तहसिल कार्यालयाकडे मदतही कार्यभार दिला आहे .मात्र वास्तव स्थितीमध्ये शेतकरी तहसील कार्यालयात पायपिट करताना दिसुन येत आहे.जावरा येथील गारपिटग्रस्तामध्ये विनोद खडार, रत्नाकर खंडार, अरुण खंडार, चंदु खंडार, अनिल खंडार यांच्यासह अन्य काही शेतकरी कुंटुब तहसिल कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे. मात्र त्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही.त्यामुळे या शेतकऱ्यामंध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सात दिवसांच्या आत नुकसान भरपाईची रक्कम न मिळाल्यास उपोषणाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
जावऱ्यातील गारपीटग्रस्त नुकसान भरपाईपासून वंचित
By admin | Updated: July 15, 2014 23:55 IST