शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकी भरणाऱ्यांचे व्याज होणार माफ

By admin | Updated: October 5, 2016 00:14 IST

कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या वीज ग्राहकांकडे राज्यात ३ हजार २०० कोटी रूपयांची थकबाकी आहे.

वीज ग्राहकांना सुविधा : अभय योजना सुरूअमरावती : कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या वीज ग्राहकांकडे राज्यात ३ हजार २०० कोटी रूपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने ‘अभय योजना’ सुरू केली आहे. या योजनेत तीन महिन्यांच्या आत थकबाकी भरणाऱ्यांना १०० टक्के व्याज माफ केले जाणार आहे. महिनाभरात थकबाकी भारल्यास मूळ थकबाकीतील पाच टक्के रक्कमही माफ केली जाईल. विद्युत ग्राहकांकडे थकबाकी असलेल्या मूळ रकमेत ६४९ कोटींची मूळ थकबाकी वसूल करण्याकरिता महावितरणने ही योजना सुरू केली आहे. १ नोव्हेंबरपासून योजना कार्यान्वित होईल. योजनेत कृषीपंपधारक व सार्वजनिक नळयोजनाधारक वगळता उर्वरित सर्व वर्गवारीतील ग्राहकांचा समावेश आहे. अभय योजनेचा कालावधी सहा महिन्यांचा असून थकबाकीदारांना ७५ ते १०० टक्के विलंब आकार माफ करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.अभय योजनेच्या पहिल्या तीन महिन्यात मूळ थकबाकी भरल्यास व्याज, विलंब आकाराची शंभर टक्के रक्कम माफ होईल. सहा महिन्यांत मूळ थकबाकी आणि २५ टक्के व्याजाची रक्कम भरल्यास ७५ टक्के रक्कम माफ होईल. थकबाकीमुक्त ग्राहकांना त्वरीत वीजजोडणी दिली जाईल. त्यासाठीसुद्धा ठेव, नवीन कनेक्शन शुल्क, रिकनेक्शन शुल्कासह दिली जाणार आहे. महावितरणच्या संकेतस्थळावर संपूर्ण माहिती दिली जाणार आहे.अभय योजना ही येत्या १ नोव्हेबर पासून अंमलात येणार आहे. यामध्ये थकबाकीदार वीजग्राहकांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन योजनेचा लाभ घ्यावा - फुलसिंग राठोड, पीआरओ वीजवितरण कंपनी