शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांना मुलाखतीसह लेखी परीक्षेची प्रतीक्षा

By admin | Updated: July 27, 2016 00:18 IST

महापालिकेत वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून कार्य करू इच्छिणाऱ्या १८ डॉक्टरांना मुलाखतीसह लेखी परीक्षेची प्रतीक्षा लागली आहे.

प्रशासकीय पेच : नवे वैद्यकीय आरोग्य अधिकारी केव्हा ?अमरावती : महापालिकेत वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून कार्य करू इच्छिणाऱ्या १८ डॉक्टरांना मुलाखतीसह लेखी परीक्षेची प्रतीक्षा लागली आहे. मात्र दुसरीकडे वैद्यकीय आरोग्य अधिकारीपद महापालिका स्तरावर भरणे शक्य नसल्याने प्रशासकीय पेच निर्माण झाला आहे. वैद्यकीय आरोग्य अधिकारी हे महत्वपूर्ण पद कायमस्वरुपी भरण्यासाठी तत्कालीन आयुक्तांनी अर्ज मागविलेत. जाहिरातीतील निकष पूर्ण करणाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे अर्जही दाखल केलेत. त्यात वर्धापासून लातूरपर्यंतच्या १८ डॉक्टरांचा समावेश आहे. ३१ मेपर्यंत अर्ज स्विकारण्याच्या अंतिम तारखेनंतर ५ जूनला लेखी परीक्षा व मुलाखती होणार होत्या. १८ पैकी ५ डॉक्टरांचे अर्ज निकष पूर्ण करणारे आहेत. त्यांना अद्यापही मुलाखत व लेखी परीक्षेसाठी बोलावण्यात आलेले नाही. ५ जूनला आयुक्त हेमंत पवार महापालिकेत नसल्याने लेखी परीक्षा व मुलाखतीची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल, असे उपायुक्त प्रशासन यांनी जाहीर केले होते. त्यानंतर आयुक्त पवार रजेवरही गेलेले नाहीत. पालिकेतील काहींनी वैद्यकीय आरोग्य पदावर प्रभारींचेच राज्य राहावे, यासाठी खासा प्रयत्न चालवला आहे. त्यासाठी यंत्रणेची दिशाभूल झाल्याचाही आरोप होत आहे. सुमारे ७ लाख अमरावतीकरांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदाच्या मुलाखत व लेखी परीक्षेचा मुहूर्त काढावा, अशी मागणी पात्र डॉक्टरांकडून होत आहे. (प्रतिनिधी)लेखी परीक्षा, मुलाखत केव्हा?वैद्यकीय आरोग्य अधिकारी या नियमित पदासाठी ३१ मे पर्यंत अर्ज स्विकारण्यात आले. त्यानंतर १ जूनला पात्र-अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार होती, तर ५ जूनला लेखी परिक्षा आणि मुलाखती होणार होत्या. तशी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. मात्र दोन महिने होत असताना या पदाच्या लेखी परिक्षा व मुलाखतीला तारीख घोषित न झाल्याने अर्ज भरणाऱ्यांमध्ये शंकेचे काहूर उठले आहे. प्रभारींचे ग्रहण ‘जैसे थे’वैद्यकीय आरोग्य अधिकारी या महत्त्वपूर्ण पदाला ग्रहण लागले आहे. मागील आठ वर्षांपासून आलटून पालटून प्रभारींवर कारभार हाकला जातो आहे. थेट राष्ट्रीय माध्यमांमध्ये जाहिरात दिल्यानंतर व उमेदवारांकडून व्यापक प्रतिसाद मिळाल्यानंतरही ही प्रक्रिया गर्भातच आहे.यंत्रणेसमोर पेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी या पदासाठी लेखी परीक्षेची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल, याची नोंद घेण्याचे आवाहन उपायुक्त विनायक औगड यांनी केले होते. मात्र लेखी परीक्षा केव्हा, याबाबत खुद्द औगडही संभ्रमित आहेत. क्लास वन अधिकारीपद मनपा स्तरावर भरणे शक्य नसल्याने त्यांचेसमोरही पेच उभा ठाकला आहे.वर्चस्वाची किनारवैद्यकीय आरोग्य अधिकारी पदाचा तात्पुरता प्रभार घेण्यासाठी गतवर्षी दोन वरिष्ठ डॉक्टर परस्परांसमोर ठाकले होते. ही वर्चस्वाची लढाई होती. तुर्तास सीमा नेताम यांच्याकडे या पदाचा प्रभार आहे. या महत्वपूर्ण खुर्चीवर कायमस्वरुपी अधिकारीच बसूच नये, अशी तजवीज करण्यासाठी अनेकजण प्रयत्नशिल असताना आयुक्तांसमोरही त्या जाहिरातीचे काय करावे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महापालिकेच्या आकृतीबंधाला शासनाची मान्यता मिळाल्यानंतरच पदभरतीसंदर्भात पुढील कारवाई करण्यात येईल.- हेमंत पवार, आयुक्त, महापालिका