शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला ‘युडी’ची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 22:46 IST

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला नगरविकास विभागाकडून मिळणाऱ्या प्रशासकीय मान्यतेची आस लागली आहे. मजीप्राकडून तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर नगरविकासच्या निर्णयाकडे पालिका प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देमजीप्राकडून तांत्रिक मान्यता : बहुप्रतीक्षित प्रकल्पांच्या कार्यान्वयनाने ‘कचरा’प्रश्न निकाली निघणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला नगरविकास विभागाकडून मिळणाऱ्या प्रशासकीय मान्यतेची आस लागली आहे. मजीप्राकडून तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर नगरविकासच्या निर्णयाकडे पालिका प्रशासनाचे लक्ष लागले आहे.जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाल्याने महापालिका प्रशासनाने त्यासाठी पाठपुरावा चालविला असून, या आठवड्यात नगरविकास विभागही महापालिकेच्या बहुप्रतीक्षित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवी झेंडी देण्याचे संकेत आहेत.महापालिकेच्या आमसभेने मान्यतेची मोहोर उमटविल्यानंतर सुकळीसह तीन ठिकाणच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला डीपीआर नगरविकास मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. ३८.३७ कोटी रूपये किंमतीचे सविस्तर अंदाजपत्रक व आराखडा तांत्रिक मान्यतेसाठी मजीप्राकडे १५ फेब्रुवारीला पाठविण्यात आला. स्वच्छ महाराष्टÑ अभियान (नागरी)चे राज्य अभियान संचालकाकडून मिळालेल्या आराखड्यास मजीप्राने २५ मे रोजी तांत्रिक मान्यता दिली. तत्पूर्वी निरीनेही प्रकल्प ‘ओके’ ठरविल्याने कार्यान्वयनातील अडथळे दूर सारले गेले असून आता केवळ नगरविकास विभागाच्या प्रशासकीय मान्यतेची तेवढी औपचारिकता शिल्लक आहे. शहरात रोजकाठी निघणारा २०० टन कचरा व सुकळी कंपोस्ट डेपोत साचलेला ५ ते ६ लाख मेट्रीक टन कचºयावर प्रक्रिया करून शास्त्रोक्त विल्हेवाट लावणारा हा प्रकल्प महापालिकेसाठी ‘मैलाचा दगड’ ठरणार आहे. मजीप्राने महापालिकेच्या ३८.३७ कोटी रूपये किमतीचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या सविस्तर आराखड्यास तांत्रिक मान्यता दिल्याचे मुख्य अभियंता एस. एस. चारथळ यांनी कळविले आहे. तांत्रिक मान्यतेचे पत्र महापालिका प्रशासनाला मिळाले आहे.या अटींवर मिळाली मान्यताप्रकल्पाची निविदा काढण्यापूर्वी मंजूर कामाचे वर्किंग एस्टीमेट तयार करून सक्षम अधिकाºयांची मंजुरी घ्यावी, लॅन्डफिल एरिया हा लॅन्ड डेव्हलपमेंट अथारीटीने आयडेंटीफाय करून महापालिकेस हस्तांतरित केल्याची धारणा पक्की करावी, दरसुचीमध्ये समाविष्ट नसलेल्या बाबीकरिता कोटेशन मागवून दराची खात्री करण्याची अट मजीप्राने टाकली आहे.घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तो स्वयंसंतुलित होण्यासाठी आवश्यक तो कर घरपट्टीमध्ये वाढविण्याची जबाबदारी मनपाची राहील. निविदा बोलावण्यापूर्वी प्रकल्पाकरिता आवश्यक जागा महानगरपालिकेच्या ताब्यात असल्याची खात्री करावी, अशी सूचना मजीप्राने केली आहे.