शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 22:04 IST

यंदा नियमित रेल्वे गाड्यांमध्ये १५ फेब्रुवारीपासून ‘नो रूम’ असे फलक झळकत असून आरक्षण मिळत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात सुट्यांमध्ये मौजमजा, सहलीला जाण्याचे नियोजन करताना रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल आहेत. किमान उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण करून प्रवास करावा, अशी तयारी आहे. परंतु, अद्यापही उन्हाळी विशेष गाड्य़ांचे वेळापत्रक जाहीर झाले नसल्याने अनेकांना या गाड्यांची प्रतीक्षा लागली आहे.

ठळक मुद्देनियमित गाड्यांमध्ये ‘नो रूम’ : मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद मार्गे गाड्यांना पसंती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा नियमित रेल्वे गाड्यांमध्ये १५ फेब्रुवारीपासून ‘नो रूम’ असे फलक झळकत असून आरक्षण मिळत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात सुट्यांमध्ये मौजमजा, सहलीला जाण्याचे नियोजन करताना रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल आहेत. किमान उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण करून प्रवास करावा, अशी तयारी आहे. परंतु, अद्यापही उन्हाळी विशेष गाड्य़ांचे वेळापत्रक जाहीर झाले नसल्याने अनेकांना या गाड्यांची प्रतीक्षा लागली आहे.दहावी, बारावीच्या परीक्षा २३ मार्चपर्यत संपणार आहे. तर विद्यापीठ स्तरीय उन्हाळी परीक्षांना १ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. बहुतांश कुटुंबात दहावी, बारावीची परीक्षा आटापल्यानंतर उन्हाळी सहल, पर्यटनस्थळी मौजमजा करण्याचे बेत आखले. परंतु, लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण फेब्रुवारीपासून ‘नो रूम’ असे झळकत आहे.विशेषत: मुंबई, पुणे, चैन्नई, बंगळूरू, दिल्ली मार्गे ये- जा करणाऱ्या लांब पल्ल्यांचा नियमित गाड्यांमध्ये आरक्षण नाही. त्यामुळे लांब पल्ल्यांचा प्रवास कसा करावा, हा मोठा गंभीर सहलीचे नियोजन करणाऱ्यांपुढे उपस्थित झाला आहे. किंबहुना उन्हाळी विशेष गाड्या सुरू झाल्यास त्या गाड्यांमध्ये आरक्षण करावे आणि सहलीला जावे असे अनेकांनी नियोजन चालविले आहे. मात्र, १५ एप्रिल उजाडल्यानंतरही रेल्वे बोर्डाकडून उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या जाहीर करण्यात आल्या नाहीत. तर, रेल्वे आरक्षण खिडक्यांवर दरदिवसाला सध्या उन्हाळी स्पेशल रेल्वे कधीपासून सुरू होणार, ही विचारणा केली जात आहे.या गाड्या हाऊसुफल्लअमरावती- मुंबई, गोदिंया - मुंबई विदर्भ एक्सप्रेस, नागपूर- पुणे गरीब रथ, हावडा- मुंबई गितांजली, मेल आणि कुर्ला, हावडा-अहमदाबाद एक्सप्रेस, अहमदाबाद-चैन्नई नवजीवन एक्सप्रेस, नागपूर - मुंबई दुरंतो, हावडा- पुणे डिलक्स, भुसावळ- निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस, अमरावती- पुणे एक्सप्रेस आदी गाड्यांमध्ये जून २०१९ पर्यंत आरक्षण नाही. फेब्रुवारीपासून या गाड्यांमध्ये हाऊसफुल्ल असे फलक झळकत आहे.दरवर्षी १५ मार्चपासून उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक जाहीर होते. परंतु, रेल्वे बोर्डाकडून उन्हाळी विशेष गाड्या सुरु करण्याबाबत अद्यापपर्यंत घोषणा केलेली नाही. दरदिवशी प्रवाशांकडून या विशेष गाड्यांची माहिती प्रवाशी विचारत आहेत.- शरद सयाम, मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक, बडनेरा