शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 22:13 IST

परंपरेनुसार जिल्ह्यातील खरिपाची पेरणी साधारणत: २५ जूनपर्यंत आटोपते, मात्र मागील पाच वर्षांत मान्सूनचे आगमनच जून अखेरपर्यंत झालेले नाही.

ठळक मुद्देखरिपाची तयारी पेरणीला गरज १०० मिलीमीटर पावसाचीशिवारांमध्ये लगबगतुरळक पेरण्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : परंपरेनुसार जिल्ह्यातील खरिपाची पेरणी साधारणत: २५ जूनपर्यंत आटोपते, मात्र मागील पाच वर्षांत मान्सूनचे आगमनच जून अखेरपर्यंत झालेले नाही. त्यामुळे सध्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामांची लगबग सुरू आहे. सध्या सरंक्षित संरक्षणाची सुविधा असलेल्या पाच ते सात हेक्टरमध्ये पेरणी आटोपली. किमान १०० मिमी पाऊस होईस्तोवर पेरणी करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.यंदा सरासरी इतका पाऊस होणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी’ ने वर्तविला. मात्र, गत पाच वर्षांत भाकितांनीच वाट लावल्याने दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ७० मिमी पाऊस पडला. मात्र, हा पाऊस पूर्वमान्सून असल्याने पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. शेतमजुरांच्या हाताला काम मिळाल्याने शिवारात लगबग वाढली आहे. यंदाच्या खरिपात पेरणी साधण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.गतवर्षी जिल्ह्यात दुष्काळस्थिती राहिली. अपुºया पावसाने सोयाबीनची वाट लावली. बोंडअळीने कपाशी उद्धवस्त झाली. तुरीला हमीभाव नाही, नाफेडच्या केंद्रांवर तूर विकली तर दोन महिन्यापासून चुकारे नाहीत. अनुदान आता जाहीर झाले. बोंडअळी नुकसानीची भरपाई २० टक्केच मिळाली. शेतकरी अडचणीत असताना बँकांद्वारा कर्जवाटपही नसल्याने बी-बियाण्यांची खरेदी कशी करावी, या विवंचनेत शेतकरी आहेत.जिल्ह्याची हवामान स्थितीमान्सूनची उत्तर सीमा अकोला, अमरावती गोंदिया अशीच आहे. पूर्व-पश्चिम शियर दोन उत्तरेकडे सरकत असल्यामुळे दोन दिवसांत मान्सून राज्याच्या उर्वरित भागात पोहचण्यासाठी स्थिती अनुकूल बनण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा व बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यामुळे विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. २४ जूनपर्यंत विदर्भात हलका ते मध्यम, २६ जूनपर्यंत बहुतांशी ठिकाणी गडगडाटासह मुसळधार, तसेच २८ जूनपर्यंत बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामान तज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.