शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

पाऊले चालती शाळेची वाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:12 IST

मोर्शी : दहा-अकरा महिने ऑनलाईन शाळा करून थकलेल्या विद्यार्थ्यांना आता नेहमीची शाळा हवीहवीसी वाटू लागली आहे. मार्च २०२० नंतर ...

मोर्शी : दहा-अकरा महिने ऑनलाईन शाळा करून थकलेल्या विद्यार्थ्यांना आता नेहमीची शाळा हवीहवीसी वाटू लागली आहे. मार्च २०२० नंतर मुले थेट फेब्रुवारी २०२१ मध्येच शाळेत पोहोचले. विद्यार्थ्यांमध्येसुद्धा उत्स्फूर्तपणे शाळेत येण्याचा उत्साह दिसून येत असून, आजच्या घडीला मोर्शी शहरातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती असल्याची आढळून येत आहे. सर्व शाळांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जात असले तरी संसर्ग वाढू लागल्याने कोरोना अटकावासाठी त्रिसूत्रीच्या प्रभावी अंमलबजावणीची गरज आहे.

तालुक्यात सर्वांत मोठ्या शिवाजी शाळेत शहरातील तसेच तालुक्यातील अनेक गावांवरून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असून, विद्यार्थ्यांच्या शाळेच्या प्रवेशद्वारातील प्रवेशापासून ते शाळा सुटेपर्यंत शासनाच्या संपूर्ण नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची गांभीर्याने काळजी घेत असल्याचे दिसून येते. अनुपस्थित विद्यार्थी व पालकांशी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक प्रत्यक्ष संपर्क करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश शाळांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबद्दल प्रशासन, सामाजिक संस्था, विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

------------