शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

दीड हजार शेतकरी प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 22:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : शासनाने विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्यावतीने मार्चपासून आधारभूत किमतीवर तूर, हरभरा खरेदी सुरू केली. हरभरा विक्रीसाठी १९९८ शेतकऱ्यांनी खरेदी विक्री संघामध्ये सातबारा देवून नोंदणी केली आहे. यापैकी केवळ ४३६ शेतकऱ्यांचा ५ हजार ३२७ क्विंटल ५० किलो हरभरा मोजण्यात आला. अद्याप १५६५ नोंदणीकृत शेतकरी वेटिंगवर असून, नोंदणीसुद्धा सुरू ...

ठळक मुद्दे४३६ शेतकऱ्यांची हरभरा खरेदी : गोदामात जागा नाही; खरेदीला ब्रेक

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : शासनाने विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्यावतीने मार्चपासून आधारभूत किमतीवर तूर, हरभरा खरेदी सुरू केली. हरभरा विक्रीसाठी १९९८ शेतकऱ्यांनी खरेदी विक्री संघामध्ये सातबारा देवून नोंदणी केली आहे. यापैकी केवळ ४३६ शेतकऱ्यांचा ५ हजार ३२७ क्विंटल ५० किलो हरभरा मोजण्यात आला. अद्याप १५६५ नोंदणीकृत शेतकरी वेटिंगवर असून, नोंदणीसुद्धा सुरू आहे. दरम्यान, राज्यभरात वेअर हाऊसमध्ये जागा नसल्याने सध्या हरभरा खरेदीला ब्रेक दिल्याचे सांगितले.नाफेडने आधारभूत किमतीवर ४ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल भावाने हरभरा खरेदीला सुरुवात करून सदर काम हे विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनला दिले. दरम्यानच्या काळात व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून अल्पदाराने हरभरा खरेदी करून शासनाला विकला. त्याची ओरड झाल्याने सात-बारावरून खरेदी-विक्री संस्थेकडील रजिस्टरवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना बोलावण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. हरभरा विक्रीकरिता एकूण १९९८ शेतकऱ्यांनी रजिस्टर नोंदी केल्या, तर आॅनलाइनमध्ये याच नोंदी २०४७ झाल्याचे निष्पन्न झाले. २१ मार्चपासून सुरू झालेल्या खरेदीमध्ये सव्वा महिन्यात केवळ ४३३ शेतकऱ्यांचा ५ हजार २९७ क्विंटल ५० किलो हरभरा मोजला गेला. अद्याप १५६५ नोंदणीकृत शेतकरी प्रतीक्षेत आहेत. सुरुवातीलाच व्यापारी हरभरा विकून मोकळे झाले, तर शेतकरी वाऱ्यावर आहेत.शेतकºयांच्या नावाआड व्यापाऱ्यांचाच माल विक्रीलाव्यापाºयांनी शेतकऱ्यांची अडचण पाहून हंगामाच्या सुरुवातीलाच ३ हजार रुपये ते ३ हजार २०० रुपये भावाने गावखेड्यातून हजारो क्विंटल हरभरा खरेदी केला. हाच हरभरा शासनाला ४ हजार ४०० रुपये दराने विकण्याकरिता व्यापारी प्रतिक्विंटल ३०० ते ४०० रुपये देऊन भाडोत्री सात-बारा जोडून नोंदणी करीत असल्याचे चित्र आहे. एकाच सात-बारावर हरभरा, तूर, कपाशी, सोयाबीन, ज्वारी पिकाच्या नोंदी असताना त्याच शेतात १० ते १५ क्विंटल हरभरा होतो तरी कसा, हा प्रश्न चर्चेचा विषय आहे.वेअर हाऊसमध्ये जागा नसल्याने हरभरा ठेवणार कुठे? वरिष्ठांच्या सूचनेवरून हरभरा खरेदीला तूर्तास ब्रेक दिला आहे. शासनाने वेअर हाऊस उपलब्ध करून दिल्यास जलदगतीने मोजमाप करून हरभरा वेअर हाउसला पाठविण्यात येईल.- नारायण चरपे, व्यवस्थापक, खरेदी-विक्री संस्था