शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
2
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
3
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
4
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
5
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
6
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
7
Astro Tips: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी सोमवारी करा २ लवंगांचा सोपा उपाय; विसरून जाल सगळे अपाय!
8
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
9
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
10
अवकाशातून अत्यंत स्पष्ट फोटो मिळाले असते, पण...; पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपणाची मोहीम अयशस्वी
11
अबोल वेदना, गोंधळलेली मने : पुरुषांच्या मानसिक आरोग्याची वेळीच दखल घ्या! मानसोपचारतज्ज्ञांचे आवाहन
12
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
13
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
14
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
15
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
16
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
17
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
18
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
19
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
20
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा

पशुधनाला डॉक्टरांची प्रतीक्षाच!

By admin | Updated: July 13, 2014 22:47 IST

मानोरा तालुक्यातील दोन पशुचिकित्सालय व सहा पशु प्रथमोपचार केंद्राची स्थिती पाहता पशुवैद्यकीय सेवा कोमात गेल्याचे चित्र दिसून येते.

मानोरा : जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरीता शासनाच्या वतीने पशुवैद्यकीय विभागाची निर्मिती करण्यात आली. मात्र मानोरा तालुक्यातील दोन पशुचिकित्सालय व सहा पशु प्रथमोपचार केंद्राची स्थिती पाहता पशुवैद्यकीय सेवा कोमात गेल्याचे चित्र दिसून येते. मानोरा तालुक्यात मानोरा व पोहारादेवी येथे पशुचिकित्सालय आहे. तसेच कारखेडा, कुपटा, शेंदुरजना, कोंडोली, इंझोरी, साखरडोह येथे पशु प्रथमोपचार केंद्रत आहेत. तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या चिकित्सालयात पशुवैद्यकीय अधिकार्‍याचे पद गेल्या अनेक दिवसापासून रिक्त आहे. या पदाचा प्रभार कनिष्ठ अधिकारी सांभाळत तसेच अनेक ठिकाणी पदे रिक्त आहेत. यामुळे पशुपालकांना आरोग्य सेवा संदर्भात अडचण निर्माण झाली आहे. कारखेडा येथे दोन श्रेणीचा दवाखाना आहे. या ठिकाणी सुद्धा पशुवैद्यकीय अधिकार्‍यांचे पद रिक्त आहे. या पदाचा प्रभार दुसर्‍या दवाखान्याच्या डॉक्टरवर आहे. परंतु क्षमतपेक्षा अधिक कामे असल्याने संबंधित डॉक्टरांना येथे येण्यास वेळ मिळत नाही. परिणामी येथील पशुपालकांचे हाल होत आहेत. या केंद्रावर सुमारे २५ गावातील गुरांचा उपचार केला जातो. डॉक्टर नसल्याने त्यांना परत जावे लागते किंवा खासगी डॉक्टरकडे इलाज करुन घ्यावा लागतो. परिसरात पायखुरी, तोंडखुरी या आजाराची साथ सुरु आहे. आतापर्यंंत काही गावात लसीकरण करण्यात आले नाही. शेतकरी जोडधंदा म्हणून बकर्‍या, गाई, म्हशी पाळतात शेती कामासाठी बैलजोडी वापरतात. त्याच्या आरोग्याची हमी मात्र त्यांना या पशुवैद्यकीय विभागाच्या दुर्लक्षामुळे मिळत नाही. तालुक्यातील सर्वच दवाखान्यांच्या इमारतीची दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी वालकंपाउंड नाही. गुरांना बांधण्यासाठी शेड नाही. तेथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. डॉक्टर नसल्याने अनेक ठिकाणी पट्टीबंधक, कंपाउंडरच पशुवर इलाज करताना दिसतात. कृत्रीम रेतन, पशुशिबिर, पशुखाद्य, मार्गदर्शन, दुधाळ जनावरासाठी विशेष मार्गदर्शन शिबिर घेणे आवश्यक आहे.