शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नियमबाह्य अभिन्यासांना अधिकृत होण्याची प्रतीक्षा

By admin | Updated: August 31, 2014 23:28 IST

अभिन्यास मंजूर न करता जमिनीचे परस्पर तुकडे पाडून भूखंड विकण्याचे प्रकरण शहराच्या सीमेवरील पश्चिम भागात उघडकीस आले आहे. याप्रकरणी संबंधित जमीन मालकांवर गुन्हे देखील करण्यात आले आहेत.

महापालिकेत ठराव मंजूर : शासन अध्यादेशाची अंमलबजावणी केव्हा होणार?अमरावती : अभिन्यास मंजूर न करता जमिनीचे परस्पर तुकडे पाडून भूखंड विकण्याचे प्रकरण शहराच्या सीमेवरील पश्चिम भागात उघडकीस आले आहे. याप्रकरणी संबंधित जमीन मालकांवर गुन्हे देखील करण्यात आले आहेत. मात्र भूखंड खरेदीत ज्या सर्वसामान्यांची फसवणूक झाली, त्यांना न्याय मिळावा, या अनुषंगाने महापालिका सर्वसाधारण सभेत हे अभिन्यास अधिकृत करुन ते क्षेत्र निवासी म्हणून घोषित करण्यावर शिक्कामोर्तब झाले. या प्रस्तावाच्या अनुषंगाने शासनाच्या नगर विकास मंत्रालयाने अध्यादेशसुद्धा जारी केले. परंतु १६ महिन्यांचा कालावधी लोटला असताना अद्यापपर्यंत नियमबाह्य अभिन्यास अधिकृत करण्यात आले नाही. त्यामुळे रहिवाशांना मूलभूत सोई-सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.नियमबाह्य अभिन्यास अधिकृत करण्यासह सदर क्षेत्र निवासी करण्याचा प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनाला पाठविला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने शासनाने ४ एप्रिल २०१३ रोजी अध्यादेश जारी करुन अवैध भूखंड रितसर करण्यासह हे क्षेत्र निवासी करण्याला मंजुरी दिली. या निर्णयाने ज्या नागरिकांनी नियमबाह्य भूखंड खरेदी केले. त्यांना मोठा दिलासा मिळाला. शासनाच्या या अध्यादेशानुसार नियमबाह्य अभिन्यास अधिकृत करण्याच्या अनुषंगाने महापालिकेला नव्याने प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्यात.९१२ घरांच्या संरक्षणाचा प्रस्ताव ‘जैसे थे’नियमबाह्य अभिन्यासातील भूखंड खरेदी करुन त्यावर घरे बांधण्यात आली आहेत. हा प्र्रकार मुस्लिमबहुल भागात मोठ्या प्रमाणात झाल्याचे निदर्शनास आले. मात्र बांधकाम केलेली घरे पाडणे शक्य नसल्याने महापालिका सर्वसाधारण सभा आणि शहर सुधार समितीच्या ठरावाच्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने शासनाला ९१२ घरांना संरक्षण देत ही घरे नियमित करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. अद्यापपर्यंत या प्रस्तावावर शासनाकडून उत्तर मिळाले नाही. त्यामुळे या घरांना संरक्षण देण्याचा प्रस्ताव ‘जैसे थे’ आहे.