संजय खासबागे ।लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : गत ४८ तासांपासून तालुक्यातील जंगलानजीकच्या गावांमध्ये दहशत पसरविणारी बोर अभयारण्यातील वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले नाही. सोमवारी सकाळी एका महिलेला ठार मारल्यानंतर वनविभागाने हत्तीच्या सहाय्याने वाघिणीला हुसकावून लावण्याचा प्रयत्न सुरू केला.हैद्राबादहून बोलाविली विशेष टीमवाघीण नेमकी कुठे दडून बसली आहे, याचा शोध अद्याप घेता आला नसल्याने भीतीचे सावट कायम आहे. वृत्त लिहिस्तोवर वनविभागाच्या हाती काहीच लागले नव्हते.वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्यातील वाघिणीने आष्टी तालुक्याला लागून असलेल्या वरूड तालुक्यातील गावांमध्ये शिरकाव केला. रविवारी रात्री एक गाय व कालवडीचा फडशा पाडला. सोमवारी सकाळी डवरगाव शहापूर पुनर्वसन परिसरातील एका शेतात आदिवासी महिलेवर हल्ला केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यातील वनविभागाने रेस्क्यू आॅपरेशन सुरू केले. यासाठी हैदराबादहून विशेष टीम बोलाविण्यात आली. वाघिणीला मायक्रोचीप लावण्यात आल्यामुळे तिचा पाठलाग करून जेरबंद करू, असा विश्वास वनविभागाला होता. मात्र मागील ४८ तासात वाघीण नेमक ी आहे कुठे? याचाही शोध वनविभागाला घेता आला नाही. सध्या वाघीण घोराड परिसरात असल्याचा दावा वनविभागने केला आहे. मागील ४८ तासांपासून वाघिणीच्या दहशतीत असलेल्या गावकºयांनी गावाबाहेर पाऊल टाकले नाही. अनेक शेतकरी मागील दोन दिवसांपासून शेतात गेले नाहीत. मजूरांनी शेतात जाण्यास नकार दिला आहे. जागलीवर असलेल्या मजुरांनी गावातच राहणे पसंत केले आहे. गावागावांत वाघिणीच्या हल्ल्याचे किस्से रंगत आहेत. वनविभागाने हत्ती आणल्यामुळे चर्चाना अधिकच उधाण आले आहे. दरम्यान सतर्क तेचा इशारा देत वनविभागाने जंगलात, शेतात व एकात ठिकाणी न जाण्याच्या सूचना गावकºयांना दिल्या आहेत. वनविभागाच्या रेस्क्यू पथकासोबत वनविभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, एनजीओचे कार्यकर्ते व पत्रकार आहेत.
वाघिणीचा लागेना शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 23:37 IST
गत ४८ तासांपासून तालुक्यातील जंगलानजीकच्या गावांमध्ये दहशत पसरविणारी बोर अभयारण्यातील वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले नाही.
वाघिणीचा लागेना शोध
ठळक मुद्देवरूड तालुक्यात थरार : हत्तीच्या भीतीने दडली, ४८ तासांपासून रेस्क्यू पथकाचे अविरत प्रयत्न; ड्रोनचाही वापर