शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत वेतनाची बोंबाबोंब

By admin | Updated: May 29, 2014 23:34 IST

महापालिकेचा कारभार ‘आमदनी अठन्नी खर्चा रूपया’ या म्हणीनुसार चालत असल्याने मागील तीन महिन्यांचे कर्मचार्‍यांना वेतन मिळाले नाही. उत्पन्न घसरल्याने कर्मचार्‍यांच्या वेतनाची बोंबाबोंब सुरू झाली आहे.

कर्मचारी तीन महिन्यांपासून प्रतीक्षेत : शुक्रवारी लेखणीबंद आंदोलनअमरावती : महापालिकेचा कारभार ‘आमदनी अठन्नी खर्चा रूपया’ या म्हणीनुसार चालत असल्याने मागील तीन महिन्यांचे कर्मचार्‍यांना वेतन मिळाले नाही. उत्पन्न घसरल्याने कर्मचार्‍यांच्या वेतनाची बोंबाबोंब सुरू झाली आहे. प्रशासनाच्या ढिसाळ भूमिकेमुळे कर्मचार्‍यांना वेतन मिळत नसल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला असून ३0 मे रोजी लेखणीबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. एलबीटी, बाजार परवाना, मालमत्ता कर आदी विभागातून येणारे उत्पन्न अचानक घसरल्याने महापालिकेचा आर्थिक डोलारा कसा सांभाळावा, हा प्रश्न अधिकार्‍यांपुढे निर्माण झाला आहे. अशातच एलबीटी भरण्याचे व्यावसायिकांनी टाळायला सुरुवात केल्याने एप्रिल महिन्याच्या एलबीटी उत्पन्नात एक कोटी रूपयाची तफावत निर्माण झाली आहे. प्रमुख उत्पन्नाचे स्रोत असलेल्या एलबीटीचे उत्पन्न माघारत असल्याने प्रशासकीय अधिकारी हैराण झाले आहे. मात्र खर्च काही केल्याविना कमी होत नाही, असे चित्र आहे. महापालिकेला दरमहा १0 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र उत्पन्न सात ते साडेसात कोटींवर थांबले आहेत. दरमहा तीन कोटी रूपयांची पोकळी कशी भरून काढावी, या बाबीने प्रशासन चिंतातूर झाले आहे. पुरवठादार, कंत्राटदार, प्रशासकीय खर्च, कर्मचार्‍यांच्या वेतनाची जुळवाजुळव कशी करायची याचे नियोजन करीत असताना जनतेच्या मुलभूत सोयीसुविधांचा पुरवठा करतानाही कसरत करावी लागत आहे. मार्च, एप्रिल व मे महिन्याचे वेतन थकित राहिल्याने कर्मचारी संघटनांनी संपाचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे. यात पहिला टप्पा म्हणून शुक्रवारी लेखनी बंद आंदोलन केले जाणार आहे. प्रशासनाने त्वरीत वेतनाची व्यवस्था केली नाही तर बेमुदत उपोषण केले जाईल, असा इशारा महापालिका कर्मचारी संघटनेने दिला आहे. पुरवठादार व कंत्राटदाराचे १0 कोटी, साफसफाई कंत्राटदार ९ कोटी वीज देयकांचे एक कोटी रूपये थकित आहेत. एलबीटी उत्पन्न घसरल्याचा पहिला फटका कर्मचार्‍यांच्या वेतनावर बसला आहे. तर दुसरीकडे थकीत रक्कम मिळावी यासाठी कंत्राटदार, पुरवठादार लेखाविभागाच्या पायर्‍या झिजवतानाचे दिसून येते. तिजोरीत ठणठणाट अशी स्थिती असल्याने वेतनासाठी रक्कम कोठून आणावी, हा प्रश्न अधिकार्‍यांसमोर निर्माण झाला आहे. किमान मार्च, एप्रिलचे वेतन अदा करावे, ही न्यायीक मागणी कर्मचारी संघटनांनी उचलून धरल्याने प्रशासनविरुद्ध कर्मचारी असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.