शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

अन्न प्रक्रिया प्रकल्पासाठी जागांची पाहणी

By admin | Updated: January 22, 2016 01:31 IST

पतंजली ट्रस्टच्यावतीने प्रस्तावित ‘अन्न प्रक्रिया’ प्रकल्प साकारण्यासाठी बडनेऱ्यातील विजय मील, गोपालनगरातील

बडनेरा : पतंजली ट्रस्टच्यावतीने प्रस्तावित ‘अन्न प्रक्रिया’ प्रकल्प साकारण्यासाठी बडनेऱ्यातील विजय मील, गोपालनगरातील सूतगिरणी तर नांदगाव पेठ एमआयडीसीसह एकूण तीन जागांची पाहणी पतंजलीचे आचार्य बालकृष्ण महाराज यांनी गुरुवारी केली. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीलाही त्यांनी भेट दिली आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यात. यावेळी आ.रवीे राणा उपस्थित होते. पतंजली ट्रस्टचे आचार्य बालकृष्ण महाराज मुंबईहून विशेष विमानाने बेलोरा विमानतळ येथे पोहोचले. ‘अन्न प्रक्रिया’ प्रकल्प उभारण्याकरिता प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्यासाठी बालकृष्ण महाराज अमरावतीत आले होते. त्यानंतर याच प्रकल्पासाठी त्यांनी गोपालनगरातील ६२ एकरातील सूतगिरणीच्या जागेची चाचपणी केली. या परिसरात हा प्रकल्प उभारल्यास मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होऊ शकते. शेतकऱ्यांच्या मालाला वाढू शकते. बडनेऱ्यातील यवतमाळ टी-पॉर्इंटवर बालकृष्ण महाराजांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विलास वाडेकर, नील निरवार, विजय नागपुरे, रामू कातोरे, संजय जयस्वाल, सुधीर लवणकार, मंगेश चव्हाण, अमोल मिलखे, शबाना जलील, रिजवान, रवी वानखडे आदी उपस्थित होते. पतंजलीने बाजार समितीतून करावी धान्याची खरेदी ४अमरावती बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन, तेलबिया व संत्र्याची आवक आहे. त्यामुळे पतंजलीद्वारा येथील धान्य खरेदी केल्यास शेतकऱ्यांना सोयीचे होईल, असे सभापती सुनील वऱ्हाडे यांनी बालकृष्ण महाराजांना सांगितले. यावेळी बाजार समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.कृषी आधारित उद्योगाची निर्मिती करणार४बाजार समितीमध्ये फूडपार्क साकारण्यासंदर्भात आचार्य बालकृष्ण यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी आ. रवी राणा, आ.आशिष देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी, उपजिल्हाधिकारी (महसूल) शंकर शिरसुद्धे, उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप, प्रवीण ठाकरे, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता प्रदीप कुळकर्णी उपस्थित होते. शेतकऱ्यांना भेटून त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांची उत्पादने खरेदी करणे, अ‍ॅडव्हांस नर्सरी सुरू करणे, विदर्भात उद्योगाचे जाळे पसरविणे हे पतंजलीचे लक्ष्य असल्याचे बालकृष्ण महाराज यांनी सांगितले.