शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

चिखलदरा बांधकाम विभागातील व्हीव्हीआयपी विश्रामगृह हाउसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:17 IST

पहिल्यांदा फलक लागले: लोकमत झळकला (फोटो कॅप्शन विश्रामगृहावर पहिल्यांदा आरक्षण हाऊसफुल असल्याचे असे फलक लागले) चिखलदरा : चिखलदरा पर्यटन ...

पहिल्यांदा फलक लागले: लोकमत झळकला

(फोटो कॅप्शन विश्रामगृहावर पहिल्यांदा आरक्षण हाऊसफुल असल्याचे असे फलक लागले)

चिखलदरा :

चिखलदरा पर्यटन स्थळावर हजारोंच्या संख्येने दररोज पर्यटक भेटी देत असतांनाच येथील खाजगी हॉटेल मधील खोल्यांचे आरक्षण केल्या जाते परंतु पहिल्यांदा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या व्हीव्हीआयपी विश्रामगृहाचे आरक्षण फुल्ल झाल्याचे फलक लावण्यात आले आहे

विदर्भाच्या नंदनवनात येणाऱ्या पर्यटकांसह राजकीय व प्रशासकीय मंत्रालयीन अधिकाऱ्यांची सर्वाधिक धाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुसज्ज अशा व्हीव्हीआयपी विश्रामगृहावर असते अगदी बोटावर मोजक्या सहा खोल्यांसाठी आगाऊ आरक्षण केले तरी शासकीय नियमाच्या प्रोटोकॉल नुसार खोल्यांचे आरक्षण केल्या जाते परंतु विश्रामगृहाच्या इतिहासात पहिल्यांदा चार दिवसापूर्वीच हाउसफुल असल्याचे फलक सार्वजनिक बांधकाम विभागाला लावावे लागले आहे

बॉक्स

हजारो पर्यटक, दिलखेच नजारा

शनिवार रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी मध्ये मोठ्या प्रमाणात चिखलदरा पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मांदियाळी आहे लॉक डाऊन नंतर मात्र दररोज हजारोंच्या संख्येने पावसात भिजण्यासह,पांढर्शुभ्र धुक्यात विलोभनीय दृश्य नंदनवनाचे आहे हजारोच्या संख्येने दरोज पर्यटक भेट देतात

बॉक्स

लोकमत झळकला

शासकीय विश्रामगृहाच्या सूचनाफलकावर पुढील चार दिवसाचे आरक्षण हाउसफुल असल्याचे फलक लावण्यात आले असून त्यावर विश्रामगृहात च्या आवारात वाघोबाचे दर्शन झाल्याचे वृत्त लोकमत ने प्रकाशित केले होते ते वृत्त सुद्धा या फलकावर लावण्यात आले आहे

कोट

विश्रामगृहाच्या मोजक्याच खोल्या आहेत. प्रोटॉकल नुसार आरक्षण दिले जाते पुढील चार दिवसाचे आरक्षण पूर्ण झाल्याने विश्रामगृह परिसरात हाऊसफुल असे फलक लावण्यात आले आहे

मिलिंद पाटणकर

उपविभागीय अभियंता

सा बां विभाग चिखलदरा