शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

आज मतदान; यंत्रणा सज्ज

By admin | Updated: October 14, 2014 23:10 IST

विधानसभेसाठी बुधवार १५ आॅक्टोबर रोजी मतदान होणार असून जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांतील १३५ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम मशिन्समध्ये बंद होईल. जिल्ह्यातील २,५०४ मतदान

६९ संवेदनशील मतदान केंद्र : १३५ उमेदवार, २ हजार ५०४ केंद्र, ११ हजार २०० कर्मचारीअमरावती : विधानसभेसाठी बुधवार १५ आॅक्टोबर रोजी मतदान होणार असून जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांतील १३५ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम मशिन्समध्ये बंद होईल. जिल्ह्यातील २,५०४ मतदान केंद्रांवर तब्बल २२ लाख २१ हजार ६२३ नागरिक आज मताधिकाराचा उपयोग करतील. मतदान प्रक्रिया निर्धोकपणे पार पाडण्याकरिता १२ हजार ४४५ कर्मचारी कर्तव्य बजावतील. २२ हजारांपेक्षा अधिक पोलीस व इतर कर्मचारी मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याकरिता नियुक्त करण्यात आले आहेत. हे अधिकारी व कर्मचारी मंगळवारीच निर्देशित मतदान केंद्रांमध्ये पोहोचले आहेत.जिल्ह्यातील अमरावती, अचलपूर, दर्यापूर, मेळघाट, मोर्शी, तिवसा, धामणगाव रेल्वे आणि बडनेरा या आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानासाठी यंत्रणा सज्ज आहे. जिल्ह्यात २,५०४ मतदान केंद्र असून तेवढ्याच चमू (प्रत्येकी ४ कर्मचारी व एक पोलीस शिपाई) असे एकूण १६ हजार कर्मचारी मतदान साहित्यासह मंगळवारी सायंकाळू मतदान केंद्रांवर पोहोचले. मतदान होईपर्यंत झोनल अधिकारी सतत प्रत्येक मतदान केंद्राच्या संपर्कात राहतील. सर्व झोनल अधिकारी सहायक निवडणूक अधिकाऱ्यांशी संवाद साधतील. ज्या मतदान केंद्रांवर १२०० ते १४०० मतदार आहेत; त्याठिकाणी एकापेक्षा अधिक केंद्राध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाभरात अशा एकूण २ हजार ७५५ मतदान केंद्राध्यक्षांंची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सहा मतदान केंद्रांवर ४ सदस्य व एक पोलीस शिपायाची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानिक शिक्षक व एका चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याच्या सहकार्याने वीज पुरवठा, पिण्याचे पाणी, स्वच्छतेसह मतदानाचे नियोजन जवळपास पूर्ण झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. असे आहे जिल्ह्याचे नियोजनजिल्हयात आठ विधानसभा मतदारसंघात २२ लाख २१ हजार ६२३ मतदार आहेत. तर २५०४ मतदान केंद्र आहेत. यासाठी २७५५ मतदान केंद्राध्यक्षांसह २७५५ मतदान पथके राहणार आहे. प्रत्येक केंद्रावर एक पोलीस शिपाई व चतुर्थ श्रेणी कर्मचारी राहणार आहे. याशिवाय अमरावती आणि अचलपूर या दोन मतदारसंघांमध्ये पहिल्यांदाच ‘व्हीव्हीपॅट’ यंत्राचा प्रयोग होणार असून या मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी पाच कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत एकूण २५०४ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले असून बडनेरा ३००, अमरावती २५५, तिवसा ३१६, दर्यापूर ३३६, मेळघाट ३५२, अचलपूर २९०, धामणगाव रेल्वे ३६२, तर मोर्शीमध्ये २९३ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडेल.मतदार सर्च इंजिननिवडणुकीसाठी सर्च इंजिनच्या (६६६.५्रँिंल्ल२ुंँं2014.ूङ्मे)मदतीने नाव, मतदारसंघ, आडनाव, वडिलांचे नावनिहाय तसेच कुटुंबनिहाय मतदारांचा शोध घेण्याची सोय या मतदार सर्च इंजिनच्या वेबसाईटमध्ये करण्यात आली आहे. या सर्च इंजिनचा मतदार वापर करू शकतात.