शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

तीन पंचायत समितींसाठी शांततेत मतदान

By admin | Updated: November 23, 2014 23:10 IST

जिल्ह्यात तीन पंचायत समितींसाठी रविवारी शांततेत निवडणूक पार पडली. तिवसा, चांदूररेल्वे व धामणगावरेल्वे पंचायत समितींमधील २० गणांंसाठी रविवार मतदान घेण्यात आले.

तिवसा/धामणगाव/चांदूररेल्वे : जिल्ह्यात तीन पंचायत समितींसाठी रविवारी शांततेत निवडणूक पार पडली. तिवसा, चांदूररेल्वे व धामणगावरेल्वे पंचायत समितींमधील २० गणांंसाठी रविवार मतदान घेण्यात आले. एकूण ११३ उमेदवार निवडणूक रिंंगणात होते. मतमोजणी सोमवार २४ नोव्हेंबर रोजी होणार आहे. निवडणुकीदरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. रविवारी सकाळी ७़३० वाजता ११४ मतदान केंद्रांवर मतदानाला सुरूवात झाली. देवगाव, वरूड बगाजी, शेंदुरजना खुर्द या सर्कलमध्ये ९़३० वाजेपर्यंत केवळ तीन टक्के मतदान झाले होते़ रविवार हा आठवड्यातील बाजाराचा दिवस असल्यामुळे दुपारी साडेतीन वाजतानंतर मतदानाला वेग आला़ दुपारी साडेतीनवाजता पर्यंत जुना धामणगाव सर्कलमधील १२ हजार ८९० मतदारांपैकी ५ हजार ७६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या दरम्यान ४४़७२ टक्के मतदान झाले होते़ दुपारी ४ वाजता या भागातील १७ मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली़ अंजनसिंगी सर्कलमध्ये ११ हजार ६४७ मतदारांपैकी ६ हजार ७४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बाजाराच्या दिवसामुळे सकाळी मजूर शेतात गेले असल्याने पाच वाजता १५ मतदान केंद्रांवर मतदारांची रीघ दिसून आली़ दुपारी साडेतीन वाजतापर्यंत ५७़९५ टक्के मतदान झाले.मंगरूळ दस्तगीर या गणात ५ हजार ७३४ मतदारांनी तर वरूड बगाजी सर्कल मध्ये ५ हजार ९२१, देवगाव- ४ हजार ९३७, चिंचोली-६ हजार ४५, तळेगाव दशासर ५ हजार १३८, शेदुरजना खुर्द ५ हजार ८२८ मतदारांनी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला होता़ सायंकाळी साडेपाचपर्यंत आठ सर्कलमधील सरासरी ६० टक्के मतदान झाले़तिवसा पंचायत समितीच्या सहा गणांसाठी ३९ उमेदवार रिंगणात होते. सर्वाधिक उमेदवार तिवसा गणात होते. तिवसा पंचायत समितीत तिवसा, वरखेड, मारडा, कुऱ्हा, मोझरी, व वऱ्हा या सहा गणांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी तालुक्यात १०३ मतदान केंद्र होते. निवडणुकीत १०३ मतदान यंत्रांचा वापर करण्यात आला. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. सोमवारी २४ नोव्हेंबरला येथील अप्पर वर्धा मनोरंजन सभागृहात सकाळी १० वाजता मतमोजणी सुरु होईल. चांदूररेल्वे पंचायत समितीच्या सहा गणांसाठी ३७ उमेदवार रिंंगणात होते. त्यामध्ये आमला गणात ६२ टक्के, सातेफळ गणात ६१.३६, घुईखेड गणात ६४, राजुरा गणात ५६.८२, पळसखेड गणात ५३.६१ तर मालखेड गणात ६१.२५ टक्के मतदान झाले. तालुक्याची मतदानाची सरासरी टक्केवारी ५९.८४ टक्के आहे.तिवसा येथे ६०.५४ टक्के मतदान झाले. राज्याचे निवडणूक आयुक्त सहारिया यांनी कुऱ्हा येथील मतदान केंद्रांना भेटी दिल्या आहेत. या निवडणुकीत मतदार चिठ्ठी वाटप न झाल्याने टक्केवारी कमी राहिली.