शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

चारही जागांसाठी मतदान अनिवार्य

By admin | Updated: January 28, 2017 00:26 IST

प्रत्येक मतदाराला प्रभाग क्र. ९ चा अपवाद वगळता सर्व प्रभागात चार उमेदवार निवडून द्यावयाचे असून त्यांना मतदान करणे अनिवार्य आहे.

आयुक्त : १९ फेब्रुवारीला जाहीर प्रचारावर लगाम अमरावती : प्रत्येक मतदाराला प्रभाग क्र. ९ चा अपवाद वगळता सर्व प्रभागात चार उमेदवार निवडून द्यावयाचे असून त्यांना मतदान करणे अनिवार्य आहे. केवळ प्रभाग क्र. ९ मध्येच मतदारांना तीन मते द्यावे लागतील, रविवारी नामनिर्देशन स्वीकारणे सुरू राहणार असल्याची माहिती आयुक्त हेमंत पवार यांनी शुक्रवारी दिली.२१ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडङणुकीसंदर्भात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रांसोबत शपथपत्रातील गोषवारा मतदान केंद्राबाहेर फ्लेक्सच्या स्वरूपात लावण्यात येणार आहे. उमेदवाराला त्याच्या घरी शौचालय असल्याचे व त्याचा वापर करीत असल्याचे लेखी पत्र द्यावे लागेल. प्रथमच जिल्हा स्टेडियम येथील क्रीडा संकुलात प्रभागनिहाय मतमोजणी होणार आहे.२३ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरूवात होईल,असे ते म्हणाले.नामनिर्देशन फॉर्म आॅनलाईन पद्धतीने सायबर कॅफेमध्ये भरता येणार असून नामनिर्देशनाचे एबी फॉर्म ३ फेबु्रवारीपर्यंतच दाखल करता येतील. मतदानाकरीता एकूण ७३८ मतदान केंद्र राहणार आहेत. एका मतदान केंद्रावर अधिकाधिक ८०० मतदार राहतील. मतदाराने नाव शोधणे, मतदानकेंद्र शोधण्याकरिता ‘ट्रू वोटर अ‍ॅप’चा वापर करावा, असे यावेळी आयुक्तांनी सांगितले.अनामत रक्कम सर्वसाधारण उमेदवाराकरिता ५ हजार रूपये तर ओबीसी, एससी, एसटी, महिलांकरिता २५०० रूपये राहिल, तक्रार निवारणकक्ष व आचारसंहिता नियंत्रण पथके सुद्धा स्थापन करण्यात आली आहेत. जाहीर प्रचार १९ फेब्रुवारीला सायंकाळी ५.३० वाजता बंद होईल. अनामत रक्कम पावती झेरॉक्स, आरक्षित जागेसाठी जातप्रमाणपत्र, वैधताप्रमाणपत्र नसल्यास ते मिळण्याकरिता प्रकरण सादर केल्याची पोहोच व निवडून आल्यास ६ महिन्यांच्या आता वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, उमेदवाराचा मतदानकेंद्र प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधी गुन्हेगारी पार्श्वभूमिचा नसावा, उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून दैनिक खर्च विहित नमुन्यात दुसऱ्या दिवशी २.०० वाजेपर्यंत सादर करावा, निकालानंतर निवडणुकीचा संपूर्ण खर्च ३० दिवसाच सादर करावा लागेल. राष्ट्रीय कक्ष, राज्यस्तरील पक्ष ४० स्टार प्रचारकांची नियुक्ती करू शकतात,अशी माहिती आयुक्त हेमंत पवार यांनी दिली.