शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेतर्फे मतदार नोंदणी मोहीम

By admin | Updated: September 21, 2016 00:19 IST

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमिवर व्यापक मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे.

महापालिका आयुक्त : झोनस्तरावर मनुष्यबळ उपलब्धअमरावती : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमिवर व्यापक मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. येत्या जानेवारी महिन्यात १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या तरुण-तरुणींना मतदार नोंदणी करता येणार असल्याचे महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी सांगितले.शहरात येत्या १४ आॅक्टोबरपासून मतदार नोंदणी मोहिम राबविण्यात येईल. २०१७ च्या पूर्वार्धात होणाऱ्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर ही मोहीम आहे. यात नवीन नाव नोंदणी, मतदान ओळखपत्रावरील पत्त्यात बदल, दुरुस्ती, दुबार नोंदणी आणि मृत किंवा स्थलांतरित झालेल्या मतदारांचे नावे वगळण्यासाठी महापालिकेच्या मुख्य कार्यालयासह पाचही प्रशासकीय झोनमध्ये स्वतंत्र दालन उपलब्ध करून देण्यात आले आहे.आयुक्त म्हणाले, महापालिका निवडणुकीची मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील कार्यालयाबरोबरच झोन कार्यालयात ती सुरू राहणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र असेल, परंतु मतदार यादीत नाव नसल्यास संबंधित नागरिकाला मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. त्यामुळे आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीत नाव असल्याची नागरिकांना खात्री करावी लागणार आहे. या मोहिमेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयुक्त पवार यांनी केले आहे. (प्रतिनिधी)१ जानेवारी ‘कट आॅफ डेट’सन २०१७ मध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०१७ हा अर्हता दिनांक ठरविला आहे. हा दिनांक ग्राह्य धरून राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या दिनांकास अस्तित्वात असलेल्या मतदार याद्या वापरण्यात येतील. अर्थात १ जानेवारी २०१७ रोजी वयाची १७ वर्षे पूर्ण केलेल्यांना या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करता येईल.५ जानेवारीला अंतिम मतदार यादी१५ सप्टेंबरला प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. १५ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबरपर्यंत मतदारांनी अर्ज दाखल करण्याचा कालावधी आहे. १६ नोव्हेंबरपर्यंत आलेल्या अर्जावर निर्णय घेतला जाईल. १५ डिसेंबर रोजी निवडणूक आयोगाचा डेटाबेस अद्ययावत करून विधानसभा मतदार यादी अंतिम होईल. त्यानंतर ५ जानेवारी २०१७ रोजी अंतिम विधानसभा मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. येथे करा नावाची खात्रीराज्य निवडणूक आयोगाच्या ूीङ्म.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर मतदार यादीतील नावाची खात्री करता येणार आहे. तक्रारी असल्यास आयोगाच्या (१८००२२१९५०) या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.