शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादीचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:17 IST

अमरावती : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण ...

अमरावती : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. नवीन मतदार नोंदी, स्थानांतरणाबाबत वगळणी आदींबाबत नागरिकांनी कर्मचाऱ्यांना माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

पुनरिक्षण कार्यक्रम ९ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. दुबार, समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तांत्रिक त्रुटी दूर करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांव्दारे घरोघरी भेट देऊन तपासणी, पडताळणी, योग्यप्रकारे विभाग तयार करणे आणि मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करण्यात येणार आहे.

बॉक्स

असा आहे कार्यक्रम

एकीकृत प्रारूप मतदार यादी १ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होईल. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी १ ते ३० नोव्हेंबर, विशेष मोहिमांचा कालावधी दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेल्या दिनांकानुसार असेल. दावे व हरकती २० डिसेंबरपर्यंत निकाली काढण्यात येतील. मतदारयादीची अंतिम प्रसिध्दी ५ जानेवारी २०२२ रोजी करण्यात येणार आहे.

बॉक्स

नवतरुणांनी नोंदी कराव्यात

१ जानेवारी २०२२ रोजी ज्यांना वयाची १८ वर्षे पूर्ण होत आहेत, अशांनी नवमतदार म्हणून आपली नोंद मतदार यादीत करून घ्यावी. तसेच पात्र असूनही ज्या नागरिकांची नावे मतदारयादीत नाहीत, त्यांनीसुध्दा आपली नावे यादीत नोंदवावीत. तसेच जे मतदार स्थानांतरित झालेले आहेत, त्यांनी तसेच मरण पावलेल्या मतदारांच्या संदर्भात त्यांच्या नातेवाईकांनी आवश्यक माहिती मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना देऊन आपल्या नावाचे स्थानांतरण किंवा वगळणीकरिता सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.