शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडाच्या मातीतील तज्ज्ञांनी मांडली मते

By admin | Updated: January 3, 2016 00:30 IST

जागतिक मराठी अकादमी, 'शोध मराठी मनाचा' या संमेलनात शनिवारी पार पडलेल्या 'मुक्काम पोस्ट वऱ्हाड' या कार्यक्रमात...

मनोगत : उद्योजक संजय जाधव, शैलेश वानखडे, प्रकाश हेडा यांनी केली चर्चा संदीप मानकर  अमरावती जागतिक मराठी अकादमी, 'शोध मराठी मनाचा' या संमेलनात शनिवारी पार पडलेल्या 'मुक्काम पोस्ट वऱ्हाड' या कार्यक्रमात आपापल्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त व यशाचे शिखर गाठलेल्या या वऱ्हाडातील विशेषता अंबानगरीच्या मातीतील या नररत्नांनी विविध विषयांवर हात घालत चर्चा केली. या सर्वांना पत्रकार तथा लेखक नितीन केळकर यांनी बोलते केले. नावलौकिक मिळविलेले तरुण उद्योजक संजय जाधव, तसेच आफ्रिका खंडातील केनिया या देशातील वैद्यकीय क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सर्जन म्हणून ज्यांची ओळख आहे असे डॉ. प्रकाश हेडा व उत्कृष्ट उद्योजक तथा बिल्डर शैलेश वानखडे यांनी मिळविलेले यश हे नवीन पिढीला प्रेरणादायी ठरेल, असे विचार त्यांनी युवकांसमोर मांडला. डॉ.प्रकाश हेडा म्हणाले, तुम्ही प्रत्येक क्षेत्रात काम करताना छोट्या-छोट्या गोष्टींचे निरीक्षण करायला शिकले पाहिजे. त्यातून आत्मविश्वास वाढतो. जीवनात सर्जनता येते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करा व प्रत्येक चांगली गोष्ट जीवनात उतरविली की, जीवनात समाधान मिळते व नंतर यश तुमच्या मागे धावते. हार्डवर्क करा, जोराने पळा पण संध्याकाळी मागे पाहा. मग बघा तुम्हाला कामाचे समाधान लाभते व दुसऱ्या दिवशी जोमाने कामाला लागा. जीवनात शिस्त कटाक्षाने पाळा अमरावती : उद्योजक संजय जाधव यांनी या क्षेत्रात करिअर करणाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. ते म्हणाले, तुम्ही ज्या-ज्या क्षेत्रात काम करता त्यामध्ये तुम्ही परफेक्ट असले पाहिजे. कुठलेही काम हे देखाव्यासाठी करू नका. आपली बौद्धिक क्षमता वाढवा, तुमच्या प्रॉडक्टची गुणवत्ता वाढवा, सोच वाढवा. मग बघा यश तुमच्या मागे यश कसे धावते ते. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक गोष्ट आत्मसात केली तर व ती कलाच तुमच्या जीवनात शिस्त असेल तर शिक्षण कमी असलं तरी चालेल. पण यश हमखास मिळते, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच यशस्वी बिल्डर शैलेश वानखडे यांनी युवकांनी कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीजकडे वळावे कारण या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहे. काळानुसार त्यांची मागणी आहे. आपल्या वडिलांचे राजकमल चौकातील उड्डाण पूल बांधण्यामध्ये महत्त्वाचे योगदान असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. दूरदर्शन निवेदक, आकाशवाणी केंद्र पुणे प्रमुख पत्रकार नितीन केळकर यांनी आपल्या अभ्यासू शैलीत सर्वांना बोलते करत चर्चा केली.