----------------------------
क्रीडांगणावर परतली वर्दळ
अमरावती : दोन महिन्याच्या कठोर संचारबंदीनंतर बुधवारपासून क्रीडांगणावर वर्दळ परतली आहे. सकाळी खेळाडूंनी सराव केला, तर दुपारनंतर काही खेळाडू सरावासाठी आल्याचे विभागीय क्रीडा संकुलात दिसून आले.
------------------
महापालिकेत अभ्यागतांची गर्दी
अमरावती : संचारबंदीत शिथिलता देण्यात आल्यानंतर महापालिकेत बुधवारी अभ्यागतांची गर्दी झाल्याचे दिसून आले. कर्मचारीदेखील पुर्ण क्षमतेने उपस्थित होते. परिसरात वाहनांची दाटी झाली होती.
-----------------------
महापालिकेची शुक्रवारी व्हिसीद्वारे आमसभा
अमरावती : महापालिकेची जून महिन्यातील आमसभा व्हिसीद्वारे शुक्रवारी होत आहे. यापूर्वीची आमसभा कर्फ्यूमुळे स्थगित करण्यात आली होती. दरम्यान काही मुद्द्यांवर घमासान होण्याची शक्यता आहे.
-------------------------
शहरात धुरळणी, फवारणी नाही
अमरावती : सध्या डासांची उत्पत्ती वाढली आहे. मात्र, बहुतेक प्रभागात धुरळणी व फवारणी करण्यात आलेली नसल्याने नागरिक त्रस्त झाले अहे. प्रशासनाने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी आहे.