शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लिंगा, करवार परिसरात वाघाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 22:37 IST

सातपुड्याच्या कुशीतील करवार, लिंगा परिसरातून जाणाऱ्या वर्धा डायव्हर्शन सुपर एक्स्प्रेस कॅनॉलच्या बोगद्यात गेल्या आठ दिवसांपासून दबा धरून बसलेली वाघीण असून, ती गर्भवती आहे.

ठळक मुद्देदहशत : वनविभागाने लावले कॅमेरे

लोकमत न्यूज नेटवर्कलिंगा : सातपुड्याच्या कुशीतील करवार, लिंगा परिसरातून जाणाऱ्या वर्धा डायव्हर्शन सुपर एक्स्प्रेस कॅनॉलच्या बोगद्यात गेल्या आठ दिवसांपासून दबा धरून बसलेली वाघीण असून, ती गर्भवती आहे. येथून ये-जा करणारे नागरिक मात्र एक नव्हे, तीन वाघ असल्याचे सांगत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.सातपुड्याच्या जंगलातील पाणवठे अतितापमानामुळे आटले आहेत. त्यामुळे आठ दिवसांपासून वर्धा सीमेवरील करवार-लिंगा रस्त्यावर वर्धा डायव्हर्शन सुपर एक्स्प्रेस कॅनॉलच्या बोगद्याचा वाघाने ताबा घेतला आहे.'त्या' बोगद्यात तीन वाघांचे वास्तव्यया ठिकाणी ओलावा आहे. तीन वाघांचे येथे वास्तव्य असून, शिकारीसाठी त्यांना बाहेर पडत असल्याचे पाहिल्याचे नागरिक सांगत आहेत. वाघाच्या वास्तव्याने रात्रीने येणारा पशूपक्ष्यांचा आवाज शांत झाला आहे. वनविभाग मात्र, एका वाघावर ठाम आहे.ट्रॅप कॅमेरे लावले : कॅनॉलच्या आजूबाजूला वाघाच्या हालचाली टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. ती वाघिण असून, तीन महिन्यांची गर्भवती आहे. तेथे दोन वाघ होते. मात्र, आता केवळ वाघिणीचे अस्तित्व आहे, असे वरूडचे प्रभारी वनाधिकारी संतोष दगडे यांनी सांगितले.