७ मिनिटे १६ सेकंद दर्शन : साध्या डोळ्यांनीही पाहणे शक्यअमरावती : आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक मंगळवार, २८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजून ६ मिनिटे व ३७ सेकंदांनी अमरावती शहरावरुन भ्रमण करणार आहे. यावेळी या अवकाश स्थानकाची तेजस्विता वजा २.१ (जास्त) असल्याने साध्या डोळ्यांनाही ते सहज दिसू शकेल. फुटबॉल मैदानाच्या आकारापेक्षा मोठे असलेले ४५५ टन वजनाचे अवकाश स्थानक आकाशमार्गे जाताना एखाद्या ठळक ताऱ्याप्रमाणे भासणार आहे. हे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाने यापूर्वीही अमरावती शहरावरून प्रवास केला आहे़ तेजस्विता कमी असल्याने डोळ्यांनी नैसर्गिकरीत्या ते पाहता आले नाही़; तथापि, यावेळी तेजस्विता अधिक असल्याने आकाश नीरभ्र असल्यास नागरिकांना या अनोख्या दृश्याचे अवलोकन करता येणार आहे. हे अवकाश स्थानक उत्तर आणि पश्चिम दिशेच्या (वायव्य) मधून अमरावतीच्या आकाशात प्रविष्ट होईल़ १० मिनीट पूर्व आकाशाकडे पहावे लागणार आहे.
अवकाश स्थानकाचे आज अमरावती शहरावरून भ्रमण
By admin | Updated: April 28, 2015 00:18 IST