शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अडगावच्या ग्रामस्थांचा सीईओंच्या दालनात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 22:37 IST

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अडगाव बु। येथील ग्रामपंचायतीत राजगार हमी योजनेच्या कामात अपहार केल्याप्रकरणी .....

ठळक मुद्देआ. जगतापांचे नेतृत्व : ग्रामसेवक, रोजगारसेवकावरील कारवाई मागे घ्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अडगाव बु। येथील ग्रामपंचायतीत राजगार हमी योजनेच्या कामात अपहार केल्याप्रकरणी ग्रामसेवक व रोजगार सेवकांवर केलेल्या कारवाईच्या विरोधात गावकरी जिल्हा परिषदेवर धडकले. आ.वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात मुख्यकार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांच्या दालनात ठिय्या देत ग्रामस्थांनी नियमबाह्य कारवाई रद्द करण्याची मागणी रेटून धरली.अडगाव ग्रामपंचायतीमध्ये रोहयोच्या कामात अपहार झाल्याची तक्रार येथील सरपंचांनी केली होती. त्यानुसार याप्रकरणाची चौकशी झेडपी प्रशासनाने केल्यानंतरही कारवाई करण्यात आली नव्हती. दरम्यान सरपंच व काही सहकाºयांनी स्वातंत्र्यदिनी कारवाईच्या मागणीसाठी उपोषण केले. त्यानुसार प्रशासनाने ग्रामसेवक नीलेश भुसारी यांच्यावर निलंबनाची, तर रोजगारसेवक मोरेश्वर दिवटे यांना बडतर्फ केले होते. मात्र, राजकीय दबावातून ग्रामसेवकांवर ही कारवाई केल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे.कोणताही अपहार केला नसताना ग्रामसेवक नीलेश भुसारी व रोजगारसेवक मोरेश्वर दिवटे यांच्यावर विनाकारण कारवाई केल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने ही कारवाई त्वरित मागे घेण्यात यावी, सरपंच यांनी केलेली रोजगारसेवकांची तक्रार राजकीय हेतुने प्रेरित असल्याचा आरोप गामस्थांनी केला.उशिरापर्यंत नागरिकांचा ठिय्यात्यामुळे ग्रामपंचायतीत पार पडलेल्या ग्रामसभेतील ठरावात दिवटे यांनाच रोजगार सेवक म्हणून कायम ठेवावे, असा निर्णय घेतल्याचे यानिवेदनात म्हटले आहे. या रोजगार सेवकांला सेवेत परत घेईपर्यंत येथून हटणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली. ग्रामसभेत झालेला ठराव लेखीस्वरूपात जोपर्यंत प्राप्त होणार नाही, तोपर्यंत यावर निर्णय घेणार नसल्याचे स्पष्ट मत सीईओंनी मांडले. दरम्यान दुपारी उशिरापर्यंत हा ठराव प्रशासनाला प्राप्त झाला नव्हता. त्यामुळे निर्णयाच्या प्रतीक्षेत नागरिक बसून होते. या आंदोलनात अडगावचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.