शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

पोहरा-चिरोडीत सफारीदरम्यान पट्टेदार वाघांचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:02 IST

जिल्ह्यातील पोहरा-चिरोडी वनक्षेत्रात निसर्ग सफारी प्रारंभ होताच दुसऱ्या  दिवशी पर्यटकांना पट्टेदार वाघोबाचे दर्शन झाले. त्यामुळे पर्यटकांचा आनंद द्विगुणित झाला.

ठळक मुद्देपर्यटक सुखावले : निसर्ग सफारीचा आनंद, स्थानिकांना रोजगाराची संधी

अमोल कोहळे ।लोकमत न्यूज नेटवर्कपोहरा : जिल्ह्यातील पोहरा-चिरोडी वनक्षेत्रात निसर्ग सफारी प्रारंभ होताच दुसऱ्या  दिवशी पर्यटकांना पट्टेदार वाघोबाचे दर्शन झाले. त्यामुळे पर्यटकांचा आनंद द्विगुणित झाला.अमरावती वनविभाग व पोहरा संयुक्त वनव्यवस्थापन समितीने जंगल सफारीबाबत उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांच्याकडे मागणी रेटून धरली होती. त्यानुसार मिणा यांनी पोहरा-चिरोडी जंगल सफारी प्रारंभ केली आणि दोन दिवसांत पर्यटकांचा लोंढा सफारीकरीता वाढल्याचे दिसून आले.पर्यटन सहलीच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सायंकाळी ५ वाजता पर्यटकांचे तीन वाहने पोहरा तलावाच्या भागात गेली आणि त्यांना चक्क पट्टेदार वाघ दृष्टीस पडला. पोहरा- चिरोडी जंगलात वाघ दिसल्याने या सर्वपर्यटकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि पर्यटकांचे फलित झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून आला. या जंगल सफारीतून स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.अन्य वन्य पशू,पक्षांचेही वास्तव्यपोहरा- चिरोडी जंगलात वाघ, बिबटसह चित्तळ, रोही, निलगाय, चिकारा, रानडुक्कर, मोर, बेडकी, काळवीट, सायाळ, ससे, मोर आदी वन्यजिवांचे वास्तव्य आहे. जंगल सफारीतून स्थानिकांना रोजगाराचे दालन उपलब्ध झाले आहे.पोहरा-चिरोडी जंगलात आम्ही निसर्ग सहलीला गेलो. अपेक्षा नसताना डोळ्यांनी पट्टेदार वाघाचे दर्शन झाले आणि अमरावती शहरानजीकचे हे जंगल खरोखरचं वैभवसंपन्न असल्याचे शिक्कामोर्तब झाले.- मधुकर चौधरी,पर्यटकमला खूप आनंद झाला. पट्टेदार वाघ खरोखरच मी डोळ्यांनी पाहिला आणि आमच्यासोबत गाईड नंद असून त्यांनी खूप चांगले मार्गदर्शन केले. पट्टेदार वाघ पाहिल्याने मला अत्यानंद झाला.- अरविंद ढोले,पर्यटकपट्टेदार वाघ बघून मनस्वी आनंद झाला. पोहरा-चिरोडी जंगलात पट्टेदार वाघ असल्याचे ऐकिवात होते. मात्र, मंगळवारी प्रत्यक्षात वाघाचे दर्शन घडल्याने या जंगलाचे वैभव अतिशय नयनरम्य आहे.- विजय गावंडे,पर्यटक