शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील नझूल जमिनी ‘फ्री होल्ड’साठी मान्यता; भोगवटदार वर्ग बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 18:12 IST

विदर्भात लिलावाद्वारे किंवा अन्य प्रकारे भाडेतत्त्वावर दिलेल्या नझूल जमिनी आता 'फ्री होल्ड' (भोगवटदार वर्ग-१) करण्यास शासनाने २ मार्च रोजी मान्यता दिली. यामुळे अमरावती व नागपूर विभागातील किमान ४० हजार पट्टामालकांना याचा लाभ मिळणार आहे.

- गजानन मोहोड

अमरावती : विदर्भात लिलावाद्वारे किंवा अन्य प्रकारे भाडेतत्त्वावर दिलेल्या नझूल जमिनी आता 'फ्री होल्ड' (भोगवटदार वर्ग-१) करण्यास शासनाने २ मार्च रोजी मान्यता दिली. यामुळे अमरावती व नागपूर विभागातील किमान ४० हजार पट्टामालकांना याचा लाभ मिळणार आहे. निवासी वापरासाठी जमिनीच्या प्रचलित वार्षिक दर विवरणातील बाजारमूल्याच्या पाच टक्के, तर व्यावसायिक प्रयोजनासाठी १० टक्के रूपांतरण अधिमूल्याची आकारणी होणार आहे.

या निर्णयामुळे पट्टेमालकांना या जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार जमीन मालकांप्रमाणेच करता येणार आहे. निवासी, वाणिज्यिक आणि औद्योगिक  प्रयोजनासाठी तत्कालीन मध्य प्रांत असलेल्या कायद्यानुसार विदर्भात महसूल विभागाद्वारा मोठ्या प्रमाणात नझूल जमिनी भाडेपट्टयाने दिल्या होत्या. या जमिनी भोगवटदार वर्ग बदलासाठी अभ्यास करून शिफारसी करण्यासाठी महसूल विभागाचे प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली २१ डिसेंबर २०१५ रोजी समिती गठित करण्यात आली होती. या समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार नझूल जमिनी 'फ्रीहोल्ड' करण्यासाठी १२ फेब्रुवारी २०१९ च्या मंत्रिमंडळ बैठकीत याविषयी मान्यता दिली. त्या अनुषंगाने अनुसरन करावयाच्या कार्यपद्धतीविषयी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी शनिवारी याविषयीच्या सूचना अमरावती व नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिका-यांना दिल्या.

ही योजना ऐच्छिक स्वरूपाची असून सवलतीचा लाभ घ्यायचा नसेल तर त्या भाडेपट्टेधारकाला जुन्या धोरणानुसार भाडेपट्टा सुरू ठेवता येईल. मात्र, धर्मादाय किंवा सार्वजनिक प्रयोजनासाठी असलेल्या नझूल जमिनी 'फ्री होल्ड' करता येणार नाही. नागपूर सुधार प्रन्यास आणि नागपूर महापालिका यांच्यामार्फत देण्यात आलेल्या नझूल जमिनीच्या भाडेपट्यासाठी हे धोरण लागू करणे, यासाठी आवयक ती कार्यवाही नगरविकास विभागाने करण्याच्या सूचना यामध्ये दिल्या आहेत.  ही आहे विहित कार्यपद्धतीनागपूर व अमरावती विभागातील अशा प्रकारचे भाडेपट्टे 'फ्री होल्ड' करण्यासाठी सर्व प्रकारच्या शर्तभंगांचे नियमितीकरण प्रचलित धोरणानुसार झाल्यानंतर भाडेपट्टेधारकाला जिल्हाधिका-यांकडे अर्ज सादर करावा लागेल. आवश्यक बाबींची पूर्तता झाल्याची खात्री केल्यानंतर जिल्हाधिका-यांद्वारा निर्धारित केलेल्या रूपांतरण अधिमूल्याचा भरणा करून घेऊन भोगवटदार वर्ग बदलाचे आदेश देतील. भाडेपट्याच्या संदर्भात काही शर्तभंग झाल्यास विहित रक्कम भरून नियमाकुल करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी पारित केल्यानंतरच तो नझूल भूखंड 'फ्री होल्ड' करण्यास पात्र समजण्यात येणार आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती