शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

विठुरायाच्या गजरात रंगली ‘विदर्भ पंढरी’

By admin | Updated: November 27, 2015 00:17 IST

‘पुंडलिक वरदे.... हरी विठ्ठल.... श्री ज्ञानदेव तुकाराम, जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल’ या भक्तीरसाने ओथंबलेल्या ...

कौंडण्यपूर गजबजले : ‘रुक्माई-वल्लभा’च्या दर्शनाचा अद्वितीय सोहळातिवसा : ‘पुंडलिक वरदे.... हरी विठ्ठल.... श्री ज्ञानदेव तुकाराम, जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल’ या भक्तीरसाने ओथंबलेल्या जयघोष आणि रुक्माई वल्लभाच्या भेटीची अनिवार ओढ यामुळे विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून हजारो भक्तांनी चालविलेल्या विठ्ठल नामगजराने श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथे गुरुवारी प्रति पंढरपूर अवतरल्याचा भास होत होता. प्राचीन विदर्भाची राजधानी असणाऱ्या श्रीक्षेत्र कौंडण्यपूर नगरीत १९ नोव्हेंबरपासून कार्तिक पोर्णिमा यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली. मात्र, गुरुवारी दहिहंडी सोहळ्याच्या निमित्ताने हजारों भाविकांची उपस्थिती होती. श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथे दीड दिवस अधिवासाचे वचन प्रत्यक्ष पांडूरंगांनी प्राणप्रिय सदाराम महाराजांना दिले होते. या पवित्र मातीमध्ये पुराणातील पाच महासतींनी जन्म घेतला. येथील मंदिरातून भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरणे केले. या प्राचीन नगरीला गतकाळातील वैभवशाली परंपरा लाभली आहे. प्राचीन भारतवर्षातील गौरवशाली परंपरा लाभलेल्या अनेक धार्मिक अमरावती जिल्ह्यातील वशिष्ठा (वर्धा) नदीकाठी असणारे श्रीक्षेत्र कौंडण्यपूर हे अग्रणी आहे. ५९ पालख्यांची परिक्रमातिवसा : गुरुवारी सकाळी कौंडण्यपूरला आलेल्या ५९ पालख्यांनी नगरात परिक्रमा केली. यावेळी चौकाचौकात दिंडी व पालख्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष हिंमतराव टाकोने, उपाध्यक्ष वसंतराव डाहे, सचिव नामदेवराव अमाळकर, कोषाध्यक्ष अरविंद वेरुळकर, सहसचिव सदानंद साधू, सदस्य रंगराव महाराज टापरे, वासुदेवराव दोड, श्रीधर देशमुख, वां.बां. बांबल, गजानन बुल, सत्यनारायण चांडक, हरीश मुंधडा, अशोक पवार, शुभांगी काळे, अतुल ठाकरे आदि उपस्थित होते. दुपारी संत अच्युत महराज सत्संग मंडळाचे अध्यक्ष सुधीर दिवे परिवारांचे वतीने उपस्थित सर्व भाविक पालख्यांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. दुपारी राजराजेश्वर महाराज कमलापीठ यांच्या मार्गदर्शन झाले.त्यानंतर अंजनगांव सुर्जी देवनाथ मठाचे मठाधिपती जितेंद्रनाथ महाराज यांनी संत अच्युत महाराज लिखित ग्रंथाचे प्रकाशन केले. दहीहांडी सोहळ्याचे प्रवचन हभप ज्ञानेश्वर महाराज गुल्हाने यांनी केले. सायंकाळी ६ वाजता टेकडीवर दहीहांडी सोहळा पार पडला. यावेळी हजारों भाविक भक्त उपस्थित होते.