शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन विजय कुबडे पसार

By admin | Updated: January 17, 2017 00:04 IST

संशयास्पद व्यवहाराद्वारे शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवणाऱ्या कुबडे ज्वेलर्सचे संचालक विजय कुबडेने सोमवारी पोलिसांच्या हातावर तुरी दिली.

न्यायालयात सापळा : प्रतिष्ठानावर धाड, कर्मचाऱ्यांचे बयाण अमरावती : संशयास्पद व्यवहाराद्वारे शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवणाऱ्या कुबडे ज्वेलर्सचे संचालक विजय कुबडेने सोमवारी पोलिसांच्या हातावर तुरी दिली. शहर कोतवाली पोलिसांनी विजय कुबडे याला अटक करण्यासाठी न्यायालय परिसरात सापळा रचला होता. मात्र, याचा सुगावा लागल्याने विजय कुबडे न्यायालयात पोहोचलाच नाही. जिल्हा उपनिबंधक राजेंद्र पालेकर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी परवानाधारक सावकार महादेव कुबडेविरूद्ध गुन्हे नोंदविले. तूर्तास कुबडे ज्वेलर्सचे संचालक म्हणून आता त्यांचा मुलगा विजय कुबडे जबाबदारी सांभाळत आहे. विजय कुबडे व त्यांचा मुलगा समीर हे दोघेही सावकारीचे कामकाज पाहतात. कोतवाली पोलिसांनी सोमवारी या प्रतिष्ठानात धाड घालून तेथील महत्त्वाचे दस्तऐवज ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेजची तपासणीअमरावती : कुबडे ज्वेलर्सकडे असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांच्या याद्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. समीर कुबडेसह तेथील काही कर्मचाऱ्यांचे बयाण पोलिसांनी नोंदविले. तेथील सीसीटीव्ही फुटेजची पाहणीसुद्धा केली. त्यानंतर विजय कुबडे हे अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात येत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. पोलिसांनी न्यायालयात सापळा रचला. मात्र, याची पूर्वसूचना विजय कुबडेला मिळाल्याने न्यायालय परिसरात पोहोचण्याची त्याची हिंमत झाली नाही. पोलिसांना रिक्त हस्ते परतावे लागले. याप्रकरणी ठाणेदार विजय पाटकर यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गोकूळ ठाकूर करीत आहे.१० किलो सोने गहाणशहर कोतवाली पोलिसांनी सोमवारी ‘कुबडे ज्वेलर्स’ची झडती घेऊन महत्त्वाचे दस्तऐवज जप्त केले. शेतकऱ्यांनी अंदाजे १० किलो सोने गहाण ठेवल्याचे उपलब्ध दस्ताऐवजांच्या आधारे निदर्शनास आले. या सोन्याची किंमत १ कोटी ७१ लाख रुपये असल्याचा अंदाज आहे. या शेतकऱ्यांवर कुबडे ज्वेलर्समुळेच कर्जमाफीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ‘आॅफ दी रेकॉर्ड’ व्यवहार किती पसरलेला आहे, हेदेखील तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.काँग्रेसनगरातील घरावर 'वॉच'शहर कोतवाली पोलिसांनी कुबडे ज्वेलर्समध्ये जाऊन महत्त्वाचे दस्तऐवज जप्त केले. त्यानंतर विजय कुबडेला अटक करण्यासाठी पोलीस त्यांच्या काँग्रेसनगरातील घरी गेले होते. तेथेही ते आढळून आले नाहीत. पोलिसांनी त्यांच्या आप्तांची चौकशी केली. घरावर 'वॉच' ठेवला आहे.