शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हिक्टर’च्या नाईट राऊंडमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:07 IST

शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर वचक राहण्याच्या उद्देशाने पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक रस्त्यावर उतरले आहेत.

ठळक मुद्दे१० दुचाकी जप्त : रिच गार्डनच्या संचालकासह दहा जणांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर वचक राहण्याच्या उद्देशाने पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक रस्त्यावर उतरले आहेत. सलग दोन दिवसांपासून पोलीस आयुक्तांनी शहरात रात्रकालीन राऊन्ड लावल्यामुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. सोमवारी रात्री सीपींनी रहाटगाव मार्गावरील रिच गार्डनवर धाड टाकून संचालकसह मद्य प्राशन करणाºया १० जणांना अटक केली.विलासनगर स्थित आशीर्वाद, आदर्श व चियर्स बारची पोलिसांनी तपासणी करून वॉन्टेड चार आरोपींना ताब्यात घेतले.दरम्यान बारसमोर उभ्या असलेल्या विनाक्रमाकांच्या १० दुचाकी जप्त केल्या. त्याच मार्गावरील सर्व हॉटेल व बारवर लक्ष केंद्रित करीत सीपींनी रहाटगाव रिंगरोडकडे मोर्चा वळवला. तेथील रिच गार्डन हॉटेलची तपासणी केली असता मद्य प्राशन करणारे १० ग्राहक आढळले. हॉटेलमध्ये गोपनीय खोली असल्याचे दिसून आले.खोल्याची तपासणी करण्यात आल्यावर त्या ठिकाणी अश्लील कृत्यासंदर्भातील आपत्तीजन्य साहित्य पोलिसांना आढळून आले.नांदगाव पेठ पोलिसांनी संचालकासह १० जणांना तेथून अटक केली. परत येताना महामार्गावर काही तरुण सिगारेट ओढताना आढळले. ते गांजाची सिगारेट ओढत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन प्रतिबंधत्माक कारवाई केली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सीपींनी उचललेले पाऊल अवैध व्यावसायिकांच्या मुळावर घाला घालणारे असून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी केलेले कार्य कर्तव्यदक्ष अधिकाºयांचा पुरावाच आहे. पोलीस आयुक्तांनी अवैध धंदे रोखण्यासाठी उचलेले पाऊल हे सामान्य नागरिकांसाठी आशादायी ठरले आहे.बिअरबार चालविणाºया ‘त्या’ पोलिसावर कारवाईरहाटगाव मार्गावरील साई संतोष ढाबा चालविणारा शेखर बिरे हा ग्रामीण भागातील पोलीस कर्मचारी पदावर कार्यरत असून त्याची पत्नी नगरसेविका असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्या पोलिसांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश सीपी दत्तात्रय मंडलिक यांनी नांदगाव पेठ पोलिसांना दिले आहे. तसेच त्या पोलिसाचा 'डिफॉल्टी' अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठविण्याचे नांदगाव पेठ पोलिसांना सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत तो पोलीस कर्मचारी पसार झाला आहे.