शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

कडाक्याच्या थंडीने घेतला वृद्धाचा बळी

By admin | Updated: January 10, 2015 00:02 IST

काही दिवसांपासून शहरात थंडीचा कहर वाढला आहे. कडाक्याच्या थंडीने गारठून एका अनोळखी वृध्दाचा मृत्यू झाला. शहरातील मोर्शी मार्गावरील शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयासमोरील फुटपाथवर ही घटना घडली.

अमरावती : काही दिवसांपासून शहरात थंडीचा कहर वाढला आहे. कडाक्याच्या थंडीने गारठून एका अनोळखी वृध्दाचा मृत्यू झाला. शहरातील मोर्शी मार्गावरील शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयासमोरील फुटपाथवर ही घटना घडली. गाडगेनगर पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. सद्यस्थितीत अनोळखी वृध्दाचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात पाठविण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात थंडीची लाट पसरली आहे. थंडीने गारठून मरण पावलेला हा वृध्द निराश्रित असल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथवर रोज रात्री झोपत होता. गुरूवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून पारा घटला आहे. थंडीमुळे शहरातील जनजीवनावर परिणाम झाला आहे. शाळकरी विद्यार्थीदेखील यामुळे हैराण झाले आहेत. उड्डाणपूल, मंदिरांचे ओटे, फुटपाथवर राहणाऱ्या निराधार निराश्रितांचे या थंडीमुळे प्रचंड हाल होत आहेत. पुरेशा ऊबदार कपड्यांअभावी तसेच अंथरूण, पांघरूणाअभावी त्यांना कुडकुडत रात्र काढावी लागते. तरूण मंडळी या थंडीचा सामना कसेबसे करीत असले तरी वृध्दांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. पुरेशा रोगप्रतिकारक शक्तीअभावी थंडीमुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. गारठ्याचा सामना करण्यास सक्षम नसलेल्या निराधार वृध्दाला थंडीमुळे जीव गमवावा लागला.