अज्ञात पालकाविरुद्ध करजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा
करजगाव : अवघ्या एक-दोन दिवसांची नवजात गोंडस बालिकेला कॉलमच्या खड्ड्यात टाकून पळ काढल्याची घटना १५ जुलै रोजी खरपी येथे उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच शिरजगाव पोलिसांनी घटना गाठून पंचनाम्याअंती अज्ञात पालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
खरपी ग्रामपंचायत कार्यालयामागे बाजूला सुरू असलेल्या बांधकाम वरील कॉलम खड्ड्यात या नवजाताला फेकण्यात आले. त्यावेळी ती जिवंत होती वा मृत, हे निष्पन्न झाले नाही. परंतु, घटना उघडकीस आली तेव्हा अबोध बालिकेचा मृत्यू झाला होता. पंचनाम्यात सदर प्रसूती ही नैसर्गिक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. घटनास्थळी एक स्लीपर आढळून आली.
दोन वर्षांपूर्वीही स्त्रीभ्रूणहत्या
करजगाव येथील रामनगर परिसरात १५ सप्टेंबर २०१९ रोजी घडलेल्या स्त्रीभ्रूणहत्येचे प्रकरण अजूनही गुलदस्त्यात आहे. पोलिसांच्या तपास थंड बस्त्यात असल्याने अद्याप या प्रकरणातील मारेमारी सापडलेला नाही.