या मार्गावर जिल्हा परिषद सदस्य सोळंके यांच्या निधीतून २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. परंतु, सदर निधी अपुरा पडत असल्याने रस्त्याचे काम रखडले आहे. या मार्गावर ये-जा करणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वासराव बुरघाटे यांनी उपाध्यक्षांकडे याबाबतची तक्रार केली होती. याची दखल घेत उपाध्यक्ष विठ्ठल चव्हान, बांधकामाच्या कार्यकारी अभियंता नीला वंजारी व अमरावती पंचायत समितीचे माजी सभापती आशिष धर्माळे यांनी या रस्त्याची पाहणी केली. यावेळी सरपंच रिजवान खान, विश्वासराव बुरगाटे, रमेश थोरात, भैयासाहेब बुरघाटे, शेख हबिबभाई, छाया ठोसर, अ जमील, मुंकुद बुरघाटे, हमीद शावकार, अनिल बेलोकार, फिरोज, सुनील बुरघाटे, रमेश रावेकर, मारोती मंगरुळकर आदींची उपस्थिती होती.
वाठोडा ते म्हैसपूर रस्त्याची उपाध्यक्षांनी केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:12 IST