शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वरुड येथील वैध मापन निरीक्षक बनाफर निलंबित

By admin | Updated: April 1, 2015 00:19 IST

तालुक्यातील दुकानदारांकडून पठाणी वसुली करणारा वैध मापन निरीक्षक विजय बनाफर याला अकोला विभागाचे उपनियंत्रक ललीत हारोडे यांच्या पथकाने ...

वरूड : तालुक्यातील दुकानदारांकडून पठाणी वसुली करणारा वैध मापन निरीक्षक विजय बनाफर याला अकोला विभागाचे उपनियंत्रक ललीत हारोडे यांच्या पथकाने निलंबित केल्याने वरुडच्या व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मोर्शी उपविभागाचे वैध मापनशास्त्र विभागाचे अधिकारी विजय पतेसिंह बनाफर यांनी शहरातील दुकानदारांना अनेकवेळा धमकावून आणि कायद्याची भीती दाखवून लाखो रुपये उकळल्याची चर्चा होती. २४ मार्चला दुपारी शहरात येवून वसुली करीत असताना दुकानदार आणि व्यापाऱ्यांच्या असंतोषाचा भडका उडाला आणि या अधिकाऱ्याला पांढुर्णा चौक परिसरात चोप देवून पोलिसांच्या हवाली केले होते. व्यापारी संघाच्या वतीने पोलीस ठाण्यात वरुड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष अशोक वानखडे, माजी अध्यक्ष जगदीश उपाध्याय, गिरीधर देशमुख, विनय चौधरी, अंशूमन मानकर , बालू राउत, मोन्टी राजपूत, जितू शहा, संदीप तरार, आनंद खेरडे, लोकेश अग्रवाल यासह अनेक दुकानदारांनी तक्रार करुन सदर अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली होेती. व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून या घटनेचा निषेध केला होता. यावेळी पोलीसांनी या अधिकाऱ्याच्या कारचा पंचनामा केला असता काही वस्तू आणि रक्कमसुध्दा आढळून आली होती. वरुड ठाणेदार अर्जून ठोसरे यांनी वैध मापन शास्त्र विभाग अकोलाचे उपनियंत्रक ललित हारोडे यांचेकडे हा अहवाल पाठविला होता. त्यानुसार अकोला येथून विशेष पथक वरुडला दाखल झाले. चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आला होता. त्या अहवालानुसार वरीष्ठांनी विजय पतेसिंह बनाफर याला निलंबित केले. चौकशी सुरु केली आहे. बनाफर यांची चौैकशी करण्यासाठी औैरंगाबाद येथील वैैधमापन विभागाचे अधिकारी शालीचवार यांची नियुक्त करण्यात आले आहे. (तालुका प्रतिधीनी)