शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

पोलिसांकडून विवाह संस्थांचे ‘व्हेरिफिकेशन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 12:02 AM

प्रतीक्षा मेहेत्रे हत्याकांडानंतर शहरातील विवाह मंडळांची माहिती काढण्याचे निर्देश पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सर्व ठाण्यांना दिले होते.

ठळक मुद्देशहरात तीन विवाह मंडळेप्रेमप्रकरणातून विवाह करण्यासाठी पर्यायी व्यवस्था

आॅनलाईन लोकमतअमरावती : प्रतीक्षा मेहेत्रे हत्याकांडानंतर शहरातील विवाह मंडळांची माहिती काढण्याचे निर्देश पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सर्व ठाण्यांना दिले होते. त्यानुसार अमरावती शहरात तीन विवाह मंडळे असल्याचे निदर्शनास आले असून विवाह लावणाऱ्या या संस्थांना पोलीस विभागाकडून काही महत्त्वाच्या सूचना दिल्या जातील.सोशल मीडिया, चित्रपट, रंगारंग कार्यक्रम, टीव्ही सिरीयल आदी माध्यमांतून आजचा तरुणवर्ग प्रेम प्रकरणाकडे वळत आहे. यामध्ये अल्पवयीन मुला-मुलींचे प्रमाण अधिकच वाढले असून मुलींना पळवून नेण्याच्या घटनांमध्ये वाढसुद्धा झाली आहे. नुकतीच प्रेमप्रकरणातील एक मोठी घटना प्रकाशित झाली आहे. प्रियकराने प्रेयसीसोबत विवाह मंडळात लग्न केले. मात्र, या लग्नास मुलीच्या आई-वडिलांनी विरोध दर्शविला. त्यानंतर प्रियकराने मुलीची निर्घृण हत्या केल्याची घटना ताजीच आहे. प्रतीक्षा मेहेत्रे असे प्रेमप्रकरणाला बळी पडलेल्या मुलीचे नाव आहे. प्रेमानंतर विवाह मंडळात जाऊन प्रतीक्षा व राहुलने लग्न केले होते. त्यांच्याप्रमाणेच शहरातील अनेक मुले-मुली कुटुंबीयांना न सांगता विवाह मंडळात जाऊन लग्न करतात. रीतीरिवाजानुसार साक्षीदार व पंचांसमक्षहा हा विवाह केला जातो. हा विवाह होतो. मात्र, तरीसुद्धा समाज या विवाह ग्राह्य धरेलच असे नाही. विवाह संस्था सुरू करणारे कायदेशीर परवानगी घेतात. त्यानुसार मुला-मुलींचे लग्न लावून देतात. मात्र, शहरात असणारे हे विवाह संस्था अधिकृत आहेत किंवा नाहीत, याची शहानिशा करण्यासाठी पोलीस विभागाने आता पाऊल उचलले आहे. शहरात किती विवाह संस्था आहे, याची माहिती सीपींनी मागविली. त्यानुसार शहरात तीन विवाह संस्था असल्याचे निदर्शनास आले आहे.शहरात विवाह लावणाऱ्या किती संस्था आहेत, हे तपासून पाहणे गरजेचे आहे. त्यांची विवाह लावण्याची प्रक्रिया कशी चालते, त्याचे काम कायदेशीर चालते काय, या सर्व बाबींची पडताळणी सुरू आहे. त्यांच्या कार्यपद्धती पडताळून पाहण्यासाठी त्यांना नोटीस बजावण्यात येईल.- दत्तात्रय मंडलिक,पोलीस आयुक्त.