शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओत ऑनलाइन फाॅर्म भरणाऱ्या वाहनांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 05:01 IST

आरटीओचे मुख्य प्रवेशव्दार बंद आहे. लहान प्रवेशव्दारातून एंट्री प्रवेश केला जातो. तेथे शिकाऊ लायसन्स व पर्मनन्ट लायसन्स काढण्याकरिता दलालांचा गराडा नागरिकांच्या अवतीभोवती असतो. त्यामुळे येथे नियमापेक्षा जास्त पैसे घेतल्याशिवाय कामच होत नाही, असा सर्वांचा अनुभव आहे. आरटीओ परिसरात ३० ते ४० व्हॅनमध्ये ऑनलाईन फार्म भरून देणे, नवीन लायसन्सच्या अपार्टमेंट घेणे किंवा इतर फाॅर्म भरून देण्याचा व्यवसाय चालतो. त्यामुळे येथे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना वाहन ठेण्याससुद्धा जागा नसते. 

संदीप मानकरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आरटीओच्या परिसरात ४५० पेक्षा जास्त एजंटकम दलालांचा सुळसुळाट असतो. यासंदर्भाचा प्रश्न ‘लोकमत’ने लोकदरबारात मांडला. मात्र, तरीही आरटीओ परिसरात व्हॅनमध्ये ऑनलाईन फाॅर्म भरून देणाऱ्यांचा व्यवसाय फोफावला आहे. त्यांनी थेट आरटीओ परिसरातच दुकाने थाटली आहेत. या व्यावसायिकांना अभय कुणाचे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.आरटीओचे मुख्य प्रवेशव्दार बंद आहे. लहान प्रवेशव्दारातून एंट्री प्रवेश केला जातो. तेथे शिकाऊ लायसन्स व पर्मनन्ट लायसन्स काढण्याकरिता दलालांचा गराडा नागरिकांच्या अवतीभोवती असतो. त्यामुळे येथे नियमापेक्षा जास्त पैसे घेतल्याशिवाय कामच होत नाही, असा सर्वांचा अनुभव आहे. आरटीओ परिसरात ३० ते ४० व्हॅनमध्ये ऑनलाईन फार्म भरून देणे, नवीन लायसन्सच्या अपार्टमेंट घेणे किंवा इतर फाॅर्म भरून देण्याचा व्यवसाय चालतो. त्यामुळे येथे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना वाहन ठेण्याससुद्धा जागा नसते. विशेषत: ज्या ठिकाणी लर्निंग लायसन्स काढले जाते, अधिकाऱ्यांची वाहने उभी केली जाते, त्या ठिकाणापर्यंत एजंटांची नियमबाह्य वाहने उभी केली जातात. आरटीओ अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू असताना याकडे आरटीओ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.

आरटीओच्या बाहेरही वाहनेआरटीओच्या आतील परिसरातील जागा ऑनलाइन फाॅर्म भरून देणाऱ्या वाहनचालकांनी व्यापली आहे. मात्र आरटीओच्या बाहेरही जिजाऊ चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेकांनी अतिक्रमण करून व्यवसाय थाटला आहे. याकडे अतिक्रमण विभागाचे व वाहतूक पोलिसांचे दुुुर्लक्ष आहे. वाहने दोन्ही बाजूला लावल्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना अडचण निर्माण होते. येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

आरटीओ कार्यालयाच्या परिसरात बाहेरील वाहने ठेवून व्यवसाय करणे नियमबाह्य आहे. वाहने हटविण्याच्या सूचना यापूर्वीच संबंधित मोटर वाहन निरीक्षकांना दिल्या आहेत. त्याची माहिती घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल.- रामभाऊ गिते, प्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस