शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

साईनगरातील बसथांब्यामुळे वाहतुकीचा खोळंबा

By admin | Updated: August 13, 2015 00:58 IST

अमरावती मार्गावरील साईनगर चौफुलीवरील बसथांबा अन्य वाहनांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सर्व प्रकारची प्रवासी वाहने चौफुलीवरच थांबत असल्याने येथे वाहतुकीचा खोळंबा होतो.

चौफुलीवर वाहनांची वर्दळ : अपघाताची शक्यता बळावलीबडनेरा : अमरावती मार्गावरील साईनगर चौफुलीवरील बसथांबा अन्य वाहनांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सर्व प्रकारची प्रवासी वाहने चौफुलीवरच थांबत असल्याने येथे वाहतुकीचा खोळंबा होतो. परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने याची दखल घेऊन तत्काळ हा बसथांबा अन्यत्र स्थानांतरित करावा, अशी मागणी केली जात आहे. अमरावती-बडनेरा मार्गावर साईनगर येथे थांबा आहे. अगदी चौफुलीवरच थांबा असल्यामुळे इतर वाहतुकदारांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागतो आहे. या थांब्यावर शहर बसेस, आॅटोरिक्षा, मिनीडोअर तसेच एसटी महामंडळाच्या बसेस थांबतात. रस्ता दुभाजकामुळे मागच्या वाहनाला समोर जाता येत नाही. परिणामी वाहतूक खोळंबून राहाते. अशी परिस्थिती या चौफुलीवर नेहमीच पाहता येते. या मार्गावर वाहनांची सतत मोठी वर्दळ असते. चौफुलीवरच प्रवासी वाहतूक थांबत असल्याने वाहने खोळंबलेली असतात. साईनगर परिसर मोठा आहे. या परिसरात रहिवााशांची संख्या अधिक आहे. साईनगरकडे याच चौफुलीवरून वाहनधारकांना जावे लागते. त्याचप्रमाणे बडनेरा शहराकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या देखील प्रचंड आहे. याठिकाणी अगदी चौफुलीवर असलेला हा बसथांबा थोडा पुढे घेण्यात यावा, अशी मागणी साईनगर परिसरातील नागरिकांनी केली आहे. चौफुलीशिवाय अन्यत्र हा थांबा दिल्यास साईनगरकडे जाणाऱ्या वाहनधारकांना अडचण होणार नाही. प्रशासनाने या गंंभीर बाबीकडे लक्ष देऊन तातडीने बसथांबा हटविण्याची मागणी केली जात आहे. (शहर प्रतिनिधी )