शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याची आवक वाढूनही तेजी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 05:00 IST

अमरावती जिल्ह्यातदेखील भाजीपाला उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, पावसामुळे खराब होण्याचे प्रमाण अधिक असल्याने व वाहतूक खर्च वाढल्याने भावात तेजी दिसून येत आहे. त्यातही कोरोनामुळे नागरिक गर्दीच्या ठिकाणी येण्यास धजावत नसल्याने मागणी घटली आहे. परिणामी घाऊक व्यापारी मिळेल त्या भावात किरकोळ विक्रेत्यांना भाजीपाला विकत आहेत.

ठळक मुद्देपावसासह कोरोनाचा परिणाम : शेतकऱ्यांचेही नुकसान, डाळ महागलेलीच

इंदल चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक शेतकऱ्यांसह बाहेरगावाहून शेतकरी माल आणत असल्यामुळे बाजार समितीत भाजीपाल्याची आवक सद्यस्थितीत वाढली आहे. मात्र, पावसामुळे भाजीपाल्याची नासाडी मोठ्या प्रमाणात होत असल्याने दरवाढ कायम आहे. डाळीचे दर लॉकडाऊनच्या सुरुवातीपासूनच तेजीत असल्याने भाजीपाल्याला अधिक पसंती दर्शविली जात आहे.अमरावती जिल्ह्यातदेखील भाजीपाला उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, पावसामुळे खराब होण्याचे प्रमाण अधिक असल्याने व वाहतूक खर्च वाढल्याने भावात तेजी दिसून येत आहे. त्यातही कोरोनामुळे नागरिक गर्दीच्या ठिकाणी येण्यास धजावत नसल्याने मागणी घटली आहे. परिणामी घाऊक व्यापारी मिळेल त्या भावात किरकोळ विक्रेत्यांना भाजीपाला विकत आहेत.किरकोळ व्यापारी घरोघरी भाजीपाला विक्री करीत असताना अव्वाच्या सव्वा दराने तो ग्राहकांना विकत असल्याच्या प्रतिक्रिया सामान्य ग्राहकांकडून व्यक्त होत आहेत. हे दर मागील तीन वर्षांच्या तुलनेत अधिक भासत आहेत.हिरवा भाजीपाल्याची आवक वाढली असून, पावसामुळे खराब होत असल्याने अर्धेअधिक फेकावे लागत आहे. त्यामुळे मुद्दल निघून उर्वरित माल अल्पदरात विकत असल्याची प्रतिक्रिया चिल्लर व्यापारी आसिफ शेख हिंमत यांनी दिली. पुढील सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर दरवाढीची भीती व्यक्त होत आहे.येथून मालाची आवकअमरावती बाजार समितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह बंगळुरु, उत्तर प्रदेश, जोधपूर, औरंगाबाद, बुलडाणा, नांदेड येथून भाजीपाल्याची आवक होते. सद्यस्थितीत आले औरंगाबादहून, आलू उत्तर प्रदेश, जोधपूरहून, फूलकोबी बुलडाणा, चिखलीहून, तुरई, कारले, सांबार नांदेड, बंगळुरु येथून येत असल्याची माहिती अडते अनंत टाके यांनी दिली.