२४ तास बरसला : जमीन खरडली, पेरणी खोळंबली, पाणी घरात शिरले, वाहतूक विस्कळीतवरूड : गत २४ तासांपासून वरुड तालुक्यात संततधार पाऊस सुरु असल्याने अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. शेकडो हेक्टर जमीन पुरात खरडून गेली असूून बियाणे आणि खतेही वाहून गेलेत. मंगळवारी सकाळी ७ वाजेपर्यंत ४८.५३ मी.मी. पावसाची नोंद झाली. तालुक्यातील प्रकल्पात ४० टक्के जलसाठा आहे. नदी-नाले एकरुप होऊन वाहू लागले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.तालुक्यात २१ जूनपासून संततधार पावसाला झाली. सात महसूली मंडळामध्ये वरुड ४३ मि.मी., बेनोडा ५० मि.मी., लोणी ९०.८० मि.मी., राजूराबाजार ४६.६० मि.मी., वाठोडा चांदस ५१.३० मि.मी., पुसला ३२ मि.मी., शेंदूरजनाघाट २६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी २२ जूनला केवळ ५३.१२ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. मात्र, यावर्षी २२ जूनला १७७.४५ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला होता. काही शेतकऱ्यांनी पेरणीसुध्दा केली होती. पावसामुळे शेतात जाण्याचे मार्गही बंद झाले आहे. नदी-नाले एकरुप होऊन वाहू लागले आहेत.सावंगीत रेल्वे पुलाखाली पाणीसावंगी : सावंगी ते पुसला मार्गावर सावंगीहून १ किलामीटर अंतरावर अंतरावर नरखेड ते न्यू अमरावती हा रेल्वे मार्ग जातो. या रेल्वेमार्गावर सावंगीला ये-जा करण्यासाठी पूल उभारण्यात आला. परंतु त्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे पावसाचे पाणी त्या पुलाखाली साचून राहते. दरवर्षी पावसाळयात याठिकाणी पुराचे स्वरुप येत असल्याने वाहनचालकासह शेतकऱ्यांनासुध्दा मोठा त्रास सहन करावा लागतो.पेठ मांगरुळीत पाणी शिरले पेठ मांगरुळी : परिसरात पहिल्यांदा ५० वर्षात सततधार पावसाने कहर केलाअसून शेकडो हेक्टर शेतजमिनी खरडून नेल्या तर शेताचे बांध फुटल्याने शेतात पाण्याचे चर पडले. पेरणी सुरु असताना अनेकांचे पेरणीचे साहित्यसुध्दा वाहून गेले. गावातसुध्दा सावंगा नाल्याचे पाणी आल्याने अनेकांच्या घरात पाणी तुंबले होते. सततधार पावसामुळे अनेककाच्ंया पेरण्या रखडल्या. शेतात पाणी घुसल्याने शेतातील बांध फुटले, नुकतेच पेरणी झालेले शेत वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहेत.झोलंबा येथील जमीन अतिवृष्टीत खरडली !झोंलबा : शेतशिवारामध्ये अतिवृष्टी झाल्याने नाल्याला आलेल्या आणि नालाखोलीकरणामुळे पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेकडो हेक्टर जमीन खरडून गेल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. शेतात असलेले पी.व्ही.सी. पाईप आणि ठिबकच्या नळ्यासुध्दा वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबाबत शेतकऱ्यांनी नुकतेच तहसीलदार यांना निवेदन देऊन मदतीची मागणी केली आहे. झोलंबा येथे हिवरखेडच्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत.
वरुड तालुक्यात मुसळधार
By admin | Updated: June 24, 2015 00:34 IST