शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 22:45 IST

मेळघाटातील आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजना काटेकोरपणे राबविण्यासाठी कुरण योजना, तलावात मत्स्यबीज सोडून मासेमारी व मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलोशिप योजनेंतर्गत विकासात्मक कामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी चिखलदरा येथील आढावा बैठकीत दिले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : आढावा बैठकीत कुरण योजना, मत्स्यबीज, ग्रामीण विकास फेलोशिपवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : मेळघाटातील आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजना काटेकोरपणे राबविण्यासाठी कुरण योजना, तलावात मत्स्यबीज सोडून मासेमारी व मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलोशिप योजनेंतर्गत विकासात्मक कामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी चिखलदरा येथील आढावा बैठकीत दिले.आढावा बैठकीला उपस्थित विविध विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिले. यावेळी जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा खत्री, उपवनसंरक्षक अविनाश कुमार, गुगामलचे शिवकुमार साहा, वनसंरक्षक सानप, बाल विकास अधिकारी दुर्गे, तालुका कृषी अधिकारी शिवा जाधव, खोज संस्थेच्या पौर्णिमा उपाध्याय, बीडीओ, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक तथा कर्मचारी उपस्थित होते.दहा गावांमध्ये नवीन प्रजातीचे कुरण लावून ३१ जुलैपर्यंत कामे पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला दिले. मेळघाटात वारी या पिकाचा पेरा वाढविण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत, असेदेखील सांगितले गेले. शेतकऱ्यांना या पिकासाठी प्रोत्साहित केल्यास चाराटंचाई निर्माण होणार नाही, असे मत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.दूध उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने तसेच विविध दुग्धपदार्थ तयार करण्यासाठी प्रक्रिया उद्योग राबविण्यात आदिवासींना सहभागी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.तालुक्यातील चिखली, भिरोजा जैथादेही, शहापूर, डोमा, सरिता, खडीमल आदी १० गावतलावांमध्ये मत्स्यबीज सोडण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतींनी त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे. मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तन योजनेंंतर्गत १० ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. या गावांचा विकास या योजनेतून केला जाणार आहे. त्याबाबत संपूर्ण ग्रामपंचायतींचा आढावा जिल्हाधिकाºयांनी याप्रसंगी घेतला.