शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदीसाठी विविध पक्ष आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 22:45 IST

शासनाने बंद केलेली तूर, हरभरा खरेदी त्वरित सुरू करण्याच्या मागणीसाठी अचलपुरात विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी निवेदन देण्यासोबत साखळी व बेमुदत उपोषण सुरू केले.

ठळक मुद्देराष्ट्रवादी, मनसे, रयत रस्त्यावर : तत्काळ चुकारे करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शासनाने बंद केलेली तूर, हरभरा खरेदी त्वरित सुरू करण्याच्या मागणीसाठी अचलपुरात विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी निवेदन देण्यासोबत साखळी व बेमुदत उपोषण सुरू केले. खरेदी बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत असून, तत्काळ खरेदी सुरू करण्यासोबत चुकारे देण्याची मागणी करण्यात आली. विविध पक्षांचे उपोषण, निवेदनांनी तहसील कार्यालय गाजले होते.शासनाने सोयाबीन, तूर, हरभरा खरेदी अचानक बंद केली. त्याचा फायदा घेत व्यापारी वर्गही शेतकरी बांधवांची मोठ्या प्रमाणामध्ये लूट करत आहेत. विशेष म्हणजे, शासनाने खरेदी केलेल्या सोयाबीन, तूर, चणा यांचे चुकारे अद्यापही शेतकºयांना देण्यात आलेले नाहीत. आता पेरणीचा हंगाम तोंडावर आलेला असून, शेतकºयांनी जगावे कसे व शेती कशी करावी, हा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. शेतकºयांचे शेती हेच उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असल्यामुळे शासनाने आता त्यांचा अंत पाहू नये तसेच शेतकरी महिलांच्या कपाळावरचे कुंकू पुसण्याचाही प्रयत्न करू नये, असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांना दिले.राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे, कल्पना वानखडे, ममता हुतके, प्रमिला बिजागरे, नीलिमा हागे, माधुरी शिंगणे, संध्या इंगळेसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेसचे साखळी उपोषणशासकीय तूर व हरभरा खरेदी सुरू करण्यासोबत बारदाना व गोदाम उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे विजय चरपे, अमोल गोहाड, अभिष वानखडे साखळी उपोषणाला बसले आहेत.चार दिवसांपासून उपोषणअचलपूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांकडून तूर व हरभराची खरेदी करण्यात आली, त्या शेतकºयांची यादी देण्याच्या मागणीसाठी रयत संघटनेचे अध्यक्ष राहुल कडू यांनी चार दिवसांपासून अचलपूर तहसील कार्यालयापुढे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. खरेदीत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा त्यांचा आरोप आहे.मनसेचे निवेदनशासनाने बंद केलेली तूर, हरभरा खरेदी पूर्ववत सुरू करा आणि बोंडअळीच्या नुकसानभरपाईची अंमलबजावणी करा, अशी मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पोटे यांनी अचलपूर येथे उपविभागीय अधिकाºयांना शनिवारी केली. मनसे तालुक्यात ठिकठिकाणी रास्ता रोको करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.