शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

श्वसनसंस्थेची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी वाफ परिणामकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:16 IST

अमरावती : श्वसनसंस्थेची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नियमित वाफ परिणामकारक ठरते, असे वैद्यकीय अधिकारी धनंजय साऊरकर यांनी सांगितले. श्वसनसंस्था निरोगी ठेवणे ...

अमरावती : श्वसनसंस्थेची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नियमित वाफ परिणामकारक ठरते, असे वैद्यकीय अधिकारी धनंजय साऊरकर यांनी सांगितले.

श्वसनसंस्था निरोगी ठेवणे व तिला विषाणूशी प्रतिकार करण्यासाठी मजबूत बनविण्यासाठी वाफ घेणे उपयुक्त ठरते. स्टीम सप्ताहानिमित्त ही बाब सर्वांनी अंगीकारली पाहिजे, असे आवाहन डॉ. साऊरकर यांनी केले. श्वसनात आपण ऑक्सिजनयुक्त हवा शरीरात घेतो व कार्बनडाय ऑक्साईड बाहेर टाकतो. ऑक्सिजनची नैसर्गिक उपलब्धता पर्यावरणात असतेच, पण जेव्हा श्वसनसंस्थेला बाधा पोहोचते तेव्हा तो कृत्रिमरीत्या उपलब्ध करून द्यावा लागतो. त्याची जाणीव कोरोनाकाळाने आपल्याला करून दिली आहे. त्यामुळे वाफ घेण्याचे महत्व कळण्यासाठी श्वसनसंस्थेची रचना जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

श्वासातील ऑक्सिजन फुफ्फुसांत वेगळा होऊन रक्तात मिसळतो व रक्तातील कार्बनडाय ऑक्साईड फुफ्फुसांमध्ये स्वासोच्छवासाद्वारे मिसळून फुफ्फुसातून बाहेर टाकला जातो. रक्तातील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण अधिक असेल तर श्वसनाचा वेग वाढतो. मानवी श्वसनसंस्थेची सुरुवात नाकपुड्यांपासून होते. नाकपुड्यातून हवा आत जाताना ती सुरुवातीला नाकातील सूक्ष्म केसांमार्फत गाळली जाते म्हणून धुळीचे कण, माती असे टाकाऊ घटक फुफ्फुसांपर्यंत पोहोचत नाहीत. घसा हा अवयव श्वसननलिका व अन्ननलिका या दोन्हींशी संबंधित असतो. घशाद्वारे आलेला वायू श्वसननलिकेकडे कंठाद्वारे जातो. श्वसननलिका या भागाद्वारे आवाज निर्माण करू शकतो म्हणून त्या भागाला ‘ध्वनीचा डब्बा’ म्हणतात. श्वसननलिका पुढे येऊन ती दोन्ही फुफ्फुसांना जोडलेली असते. छातीत श्वासननलिकेला दोन फाटे फुटतात. त्यातला एक उजव्या, तर दुसरा डाव्या फुफ्फुसाकडे जातो. छातीच्या पोकळीत हृदयाच्या डाव्या व उजव्या बाजूस प्रत्येकी एक अशी दोन फुफ्फुसे असतात व ती अहोरात्र काम करत असतात. सामान्य श्वसन दर हा दर मिनिटाला १८ ते २४ असतो. तसेच सामान्यतः शरीरातील ऑक्सिजन पातळी ९३ टक्क्यांपेक्षा अधिक असावी.

शरीर विज्ञानातील बाष्पमहात्म्य

नाक हे श्वसनमार्गाचे द्वार आहे. वाफ नाकावाटे श्वसन क्रियेदरम्यान थेट फुफ्फुसापर्यंत पोहोचते, तेव्हा वाफेचा प्रभाव नाक, घसा, श्वसनमार्ग, श्वसननलिका, फुफ्फुस यावर थेट होतो. त्यामुळे श्वसनमार्गातील सूज, अवरोध कमी होतो, त्याचप्रमाणे, श्वसनमार्ग, श्वसननलिका याठिकाणी चिकटलेला कफ, स्त्राव सुटून मोकळा होतो. श्वसनमार्ग विस्तारित होतो व त्यामुळे स्त्रोतसशुध्दी होते. त्यामुळे श्वसनप्रक्रिया सुलभ होऊन शरीरातील ऑक्सिजनची क्षमता व पातळी वाढण्यास मदत होते. सर्दी, खोकला होतो तेव्हा आपण परंपरेनुसार घरगुती उपचारात वाफ घेतो व त्यापासून आरामही मिळतो. दवाखान्यांतही नेबुलायझेशनव्दारे अनेकदा लहान बालके, अस्थमा रुग्ण यांना वाफाऱ्याच्या यंत्राचा वापर करून औषधे थेट फुफ्फुसांपर्यंत पोहचवून उपचार केले जातात.

वाफ कशी घ्यावी

घरातील स्वच्छ भांड्यात स्वच्छ साधे पाणी टाकून भांडे गरम करून पाण्याची वाफ होऊ लागल्यावर चेहरा टॉवेल अथवा तत्सम कापडाने झाकून दोन ते तीन मिनिटे वाफ घ्यावी. आयुर्वेदशास्त्रानुसार तुळशीची दोन तीन पाने, थोडासा भिमसेनी कापूर, निलगिरी तेलाचे दोन ते तीन थेंब टाकून सुद्धा वाफ घेऊ शकतो. या बाबीही अवरोध कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. वाफ घेण्यासाठी आजकाल बाजारात इलेक्ट्रिक स्टिमर उपलब्ध आहेत. वाफ शक्यतोवर सकाळी व संध्याकाळी घ्यावी. सध्या उष्णतामान अधिक असल्यामुळे दुपारी वाफ घेऊ नये. हृदयरुग्ण किंवा उच्च रक्तदाबाचा आजार असलेल्यांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार वाफ घ्यावी.