शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

वानराचा मृत्यू; दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 22:58 IST

वानरांच्या कळपावर श्वानाने हल्ला चढविल्याने माकडिणीचे पिलू गंभीर जखमी झाले, तर पळत सुटलेले एक माकड विद्युत शॉकने दगावले. ही घटना शनिवारी सकाळी साईनगर स्थित भरतनगरात घडली. निसर्गप्रेमींनी धाव घेऊन जखमी माकडिणीसह पिल्लांना उपचार दिले. या घटनेमुळे भरतनगर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. विशेष म्हणजे, वनविभागाचे पथक बऱ्याच वेळानंतर घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृत माकडाला ताब्यात घेतले.

ठळक मुद्देसाईनगर स्थित भरतनगरातील घटना : घटनास्थळी निसर्गप्रेंमींची धाव

अमरावती : वानरांच्या कळपावर श्वानाने हल्ला चढविल्याने माकडिणीचे पिलू गंभीर जखमी झाले, तर पळत सुटलेले एक माकड विद्युत शॉकने दगावले. ही घटना शनिवारी सकाळी साईनगर स्थित भरतनगरात घडली. निसर्गप्रेमींनी धाव घेऊन जखमी माकडिणीसह पिल्लांना उपचार दिले. या घटनेमुळे भरतनगर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. विशेष म्हणजे, वनविभागाचे पथक बऱ्याच वेळानंतर घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृत माकडाला ताब्यात घेतले.भरतनगरात श्वानाने माकडिणीसह पिलावर हल्ला केल्याची माहिती निसर्गप्रेमी विजय खोटे यांना मिळाली होती. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू केले. त्याचवेळी एका माकडाचा खांबावरील विद्युत तारेच्या प्रवाहाने मृत्यू झाल्याचेही निदर्शनास आले. विजय खोटे यांनी वन्यप्रेमी चेतन भारती, अनुराग बाराहाते, मयूर हरीहर, निलेश कंचनपुरे यांच्या मदतीने जखमी माकडिणीसह पिलाला ताब्यात घेतले. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यांना पशुचिकित्सक किनगे यांच्याकडे नेण्यात आले. तेथे दोन्ही वानरांवर डॉक्टरांनी उपचार सुरु केले. श्वानाने चावा घेतल्याच्या जखमेवर तब्बल २० टाके मारण्यात आले. त्यानंतर माकडिणीसह पिलाला पुढील उपचारासाठी कार्सचे राघवेंद्र नांदे यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.श्वानाच्या हल्ल्यात दोन माकडे जखमी झाली, तर विद्युत तारेच्या प्रवाहाला चिकटून एकाचा मृत्यू झाला. जखमींवर उपचार करण्यात येत आहेत.- अमोल गावनेरवनरक्षक, वडाळी