शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वलगाव ठाणे गुन्हेगारी घटनांनी हादरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 23:00 IST

शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील मात्र, शहराबाहेरील वलगाव ठाणे शनिवारी व रविवारी गुन्हेविषयक घटनांनी हादरले. महिलेवर बलात्कार, दोन चाकूहल्ले व मारहाणीच्या घटनांमुळे वलगाव परिसरात तणावसदृश स्थिती निर्माण झाली होती.

ठळक मुद्देबलात्कार, दोन चाकूहल्ले, हाणामारी : रविवारी तणावसदृश स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील मात्र, शहराबाहेरील वलगाव ठाणे शनिवारी व रविवारी गुन्हेविषयक घटनांनी हादरले. महिलेवर बलात्कार, दोन चाकूहल्ले व मारहाणीच्या घटनांमुळे वलगाव परिसरात तणावसदृश स्थिती निर्माण झाली होती.वलगाव ठाण्याच्या परिसरात गुन्हेविषयक घटना कमी असतात. मात्र, दोन दिवसांत चार गंभीर घटना समोर आल्याने तणावाचे वातावरण निर्मीत झाले होते. शनिवारी सतीनगर, अशोकनगरात हाणामारीच्या घटना घडल्या, तर रविवारी धनगर पुऱ्यातील एका तरुणांवर चाकूने प्राणघातक हल्ला चढविण्यात आला आहे.

वलगावात तरुणाला चाकूने भोसकलेधनराजपुऱ्यातील श्रीकांत दादाराव काळमेघ (२४,रा. धनगरपुरा) या तरुणावर रविवारी चाकू हल्ला झाला. नावेद खाँ नामक तरुणाने हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा संताप व्यक्त करीत शेकडो नागरिकांनी रविवारी सायंकाळी वलगाव ठाण्यावर धडक दिली.दोन कुटुंबीयांमध्ये वाद उफाळलावलगाव ठाण्यांतर्गत सतीनगरात दोन कुटुंबीयांचा वाद शनिवारी उफाळून आला. रहिम खान गुलाबर खा यांच्या तक्रारीनुसार आरोपी रहेमान शहा आमद शहा, शाहीर शहा रहेमान शहा, रोशन शहा रहमान शहा व एक महिला हे त्याच्या मेहुण्याला व त्यांच्या पत्नीला मारहाण करीत होते. भांडण सोडविण्यासाठी रहिम खान गेले असता त्याच्यावर रोशनने चाकू मारल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शाहीद शा वल्द रहमान शहा यांच्या तक्रारीनुसार वरील फिर्यादी पक्षाविरुद्ध गुन्हे नोंदविले आहे.चाकुच्या धाकावर लैंगिक अत्याचारचाकुचा धाक दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना शनिवारी सतीनगरात घडली. वलगाव पोलिसांनी शाहीर शहा रहेमान शहा (३२) व रोशन शहा रहेमान शहा (दोन्ही रा. सतीनगर) यांचेविरुद्ध भादंविच्या कलम ३७६(ड) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. एक महिला शनिवारी दुपारी घरी एकटीच असताना आरोपी तिच्या घरात शिरले. आरोपी शाहीर शहा याने महिलेस चाकूचा धाक दाखविला आणि आरोपी रोशन शहा याने जबरीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महिलेने तक्रारीतून केला आहे.