शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

वलगाव मार्ग अतिक्रमणमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 22:55 IST

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाद्वारे बुधवारी वलगाव मार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात आली. मनपा आयुक्त संजय निपाणे यांचे आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देमहापालिकेची कारवाई : कुंपण, अनधिकृत रेच्यांवर गजराज

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाद्वारे बुधवारी वलगाव मार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात आली. मनपा आयुक्त संजय निपाणे यांचे आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.नवसारी, वलगाव रोड येथील धर्मकाट्यापासून अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू करण्यात आली. या मार्गाच्या दोन्ही बाजूंचे अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. या कारवाईमध्ये कुंपणभिंत, अनधिकृत रेचे, टिनाचे बांधकाम, फर्निचर दुकाने, पानठेले, अनधिकृत दुकाने, मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण नष्ट करून रस्ते व फुटपाथ मोकळे करण्यात आले. यावेळी अतिक्रमिकांचा विरोध पोलीस बंदोबस्तात मोडून काढण्यात आला.अतिक्रमणविरोधी मोहिमेनंतर महापालिका आयुक्त संजय निपाणे व उपआयुक्त नरेंद्र वानखडे यांनी पाहणी केली. यावेळी सहायक आयुक्त योगेश पिठे, तौसिफ काझी, अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख गणेश कुत्तरमारे, उपअभियंता प्रमोद इंगोले, पोलीस निरीक्षक मानकर, अभियंता प्रदीप वानखडे, आनंद जोशी, मनोज शहाळे, जयंत काळमेघ, सचिन मांडवे, नाझीम, प्रवीण भेंडे, चैतन्य काळे, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक तसेच झोन मधील अभियंता, अतिक्रमण निरीक्षक प्रवीण इंगोले, उमेश सवई, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.शहरातील उत्तर झोन क्र. १ अंतर्गत रस्त्यांचे अतिक्रमण मंगळवारी काढण्यात आले. यावेळी पाच ट्रक साहित्य महापालिकेने ताब्यात घेतले. पाठोपाठ शहरातील अत्यंत गजबजलेला वलगाव मार्ग अतिक्रमणमुक्त करण्यात आला. महापालिकेच्या सातत्यपूर्ण कारवाईचा सुखद अनुभव गेल्या काही दिवसांत अमरावतीकर घेत आहेत.सदर कार्यवाही निरंतर सुरु ठेवण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाच्यावतीने देण्यात आले आहेत. रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम तसेच अतिक्रमण काढून वाहने तसेच पादचारी मार्ग मोकळे करण्याचे निर्देशही महापालिका प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन विभागाला देण्यात आले आहे.नागपुरी गेट, वलगाव रोडसारख्या संवेदनशील भागात बुधवारी कारवाई करण्यात आली. यावेळी पोलीस बंदोबस्त मागविला होता. ७० ते ८० अतिक्रमणे हटविण्यात आली. ४० जणांनी स्वत:हून अतिक्रमण काढले, तर २५ ते ३० अतिक्रमणांवर पथकाने कारवाई केली. अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाई निरंतर सुरू राहणार आहे.- गणेश कुत्तरमारे, प्रमुख, अतिक्रमण निर्मूलन विभाग